MHADA home lottery 2026: दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची (BMC Election 2026) आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुमारे तीन हजार घरांची लॉटरी (Mhada Lottery) काढण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लॉटरी मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्येक इंच जागेला सोन्याचा भाव असणाऱ्या मुंबईत परवडणाऱ्या दरात स्वत:चं हक्काचं घर घेण्यासाठी सामान्य नागरिक म्हाडाच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये म्हाडाने मुंबईतील मोक्याच्या जागांवर सर्वसामान्यांना अत्यंत माफक दरात घरे उपलब्ध करुन दिली आहेत. या घरांची किंमत बाजारभावापेक्षा कैकपटीने कमी असते. त्यामुळे सामान्य मुंबईकर कायमच आपल्याला म्हाडाचे घर लागू दे, अशी प्रार्थना करत असता. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. मार्च महिन्यात म्हाडाकडून घरांसाठी लॉटरी काढली जाऊ शकते. मात्र, या लॉटरीत मुंबईतील नेमक्या कोणत्या भागातील घरांचा समावेश असेल, याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. याशिवाय, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे चार हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. (Mumbai news)

Continues below advertisement

Mhada news: म्हाडाकडून 76 वर्षात 9 लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती

गेल्या 76 वर्षांत म्हाडाने राज्यात सर्वसामान्यांना सुमारे नऊ लाख परवडणारी घरे दिली आहेत. बी.डी.डी. चाळ, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, जी.टी.बी. नगर येथील पंजाबी कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, पूनम नगर, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर आदी प्रकल्प नियोजनाच्या टप्यात आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांना सर्वाधिक मागणी असते, तर कोकण मंडळाच्या घरांनाही चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, कोकण मंडळाच्या काही प्रकल्पांच्या परिसरात अद्याप पायाभूत सुविधा पूर्णपणे विकसित झाल्या नाहीत. त्यामुळे येथील घरांबाबत लॉटरीनंतर नाराजी असते. प्राधिकरणाने रस्ते, पाणी, वीज आदी पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले असून, घरांच्या किमतीही कमी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुढील लॉटरीत कोकण मंडळाच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा

सामान्य मुंबईकरांना वरळीत अलिशान घरं मिळणार, म्हाडा बांधणार 85 मजली टॉवर, आणखी कोणत्या पंचतारांकित सुविधा असणार?

म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल, अनामत रकमेच्या व्याजाचं काय असा सवाल