मुंबई : म्हाडाने यंदा सर्वाधिक किंमतीच्या सदनिकांचा विक्रम मोडीत काढला आहे. मुंबईतील ग्रँट रोडमध्ये म्हाडाच्या एका घराची किंमत 5 कोटी 80 लाखांवर आहे. तर सर्वात स्वस्त घराची किंमत 14 लाख 62 हजारांवर असणार आहे.

येत्या 5 नोव्हेंबरला घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर 16 डिसेंबरला लॉटरी जाहीर होणार आहे. आज पत्रकार परिषद घेत म्हाडाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत म्हाडाच्या 1384 घरांसाठी 5 नोव्हेंबर पासून अर्ज भरता येणार आहेत. 10 डिसेंबर अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. तर 16 डिसेंबर रोजी 1384 घरांसाठी सोडत निघणार आहे.

एकूण सदनिका-1384 

कुठे किती घर ?

अँटॉप हिल वडाळा 278

प्रतीक्षा नगर,सायन 89

गव्हाण पाडा, मुलुंड 269

पी एम जी पी मानखुर्द 316

सिद्धार्थ नगर गोरेगाव(पश्चिम) 24

महावीरनगर,कांदिवली(पश्चिम) 170

तुंगा,पवई 101

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा मार्फत प्राप्त सदनिका(मुंबई शहर) 50 

विकास नियंत्रण विनियम 33(5)अंतर्गत प्राप्त सदनिका 19

विखुरलेल्या सदनिका 68