मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गांवर तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दोन्ही धीम्या मार्गांवर ब्लॉक असणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.


मध्य रेल्वे


मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.15 वाजेपासून दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान कल्याणपासून सुटणाऱ्या जलद गाड्या दिवा ते परळदरम्यान धीम्या मार्गावर धावतील. मध्य रेल्वेची वाहतूक साधारण 20 मिनिट उशीराने असणार आहे.


हार्बर रेल्वे


हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल, बेलापूरदरम्यान अप व डाऊन मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे ते पनवेल, बेलापूर ट्रान्स हार्बर आणि नेरुळ ते खारकोपर दरम्यान दोन्ही मार्गावरील आणि पनवेल ते अंधेरी लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र ठाणे ते वाशी, नेरुळ सेवा सुरु असणार आहे.


पश्चिम रेल्वे


पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान दोन्ही धीम्या मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉग दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील उपनगरी रेल्वे फेऱ्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील.