मुंबईत 18 मार्च रोजी मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर, हार्बर रेल्वेमार्गावर कुर्ला ते मानखुर्द अप आणि डाऊन लाईनवर, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या तीनही मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काहीकाळ गैरसोय होणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 4.15 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे फास्ट मार्गावरील वाहतूक कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर वळविण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे सर्व लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकात थांबतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल स्थानकांदरम्यान फास्ट मार्गावरील लोकल्स स्लो मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु असेल.