मुंबई : मुंबईकरांसाठी रविवार म्हटला की लोकलचा मेगाब्लॉक हा ठरलेलाच असतो. रेल्वेरुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर आज माटुंगा-मुलूंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द-नेरुळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात सर्व लोकल फेऱ्या डाऊन धिम्या मार्गावरुन चालवण्यात येतील. वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व जलद लोकल सायन ते मुलुंड स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे लोकलसेवा 20 मिनिटे विलंबाने सुरु राहणार आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द - नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल/ बेलापूर/ वाशी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानच्या सर्व अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत.
प्रवाशांच्या सोईसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मानखुर्द स्थानकांदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 पर्यंत ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वे मार्गाने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2019 09:19 AM (IST)
रेल्वेरुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर आज माटुंगा-मुलूंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द-नेरुळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -