Megablock, Sunday 8 October : रविवारी म्हणजे उद्याच जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी... मध्य रेल्वेवर (Central Railway Mega Block) उद्याचा मेगाब्लॉक हा रद्द करण्यात आलाय. त्यामुळे रविवारी मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तसंच या पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.


Central Railway Mega Block : रविवारी लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी


 



रविवारी मध्य रेल्वेवरील नियमित मेगाब्लॉक रद्द


वाडीबंदर यार्ड आणि पनवेल रिमॉडेलिंगच्या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक घेतल्याने रविवारी घेण्यात येणारा नियमित मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे रविवारी मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेवर रविवारी, 8 ऑक्टोबरता मेगाब्लॉक रद्द करण्यात आला असला तरी पश्चिम रेल्वेवर दुरुस्तीचं काम असणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. 


उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामे करण्यासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. मात्र, रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. मध्य रेल्वेने अगोदरच वाडीबंदर यार्ड आणि पनवेल रिमॉडेलिंगचा नाईट ब्लॉक घेतला आहे. दोन्ही मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेने रविवारी सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर आणि सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावर आणि ट्रान्स- हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.


चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर मेगाब्लॉक


पश्चिम रेल्वेकडून रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत असणार आहे. या पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत, तर काही उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत.