कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन बुधवारी शहरातील खड्डे बुजवून घेतलं. मात्र रात्रीच्या अंधारात चाललेला केडीएमसीचा हा खेळ पाहून नागरिकांना मात्र कुतूहल वाटलं.


कल्याण शहरात पावसाळ्याच्या आधीपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. अखेर हे खड्डे बुजवायला महापालिकेला मुहूर्त सापडला आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी मागच्या वर्षीपेक्षा यंदा खड्डे कमी आहेत, अशी भूमिका घेणाऱ्या महापौरांनी काल मात्र यंदा खड्डे जास्त असल्याचं मान्य केलं.

पावसामुळे यंदा खड्डेभरणीचं काम लांबलं असून येत्या काही दिवसात कल्याण आणि डोंबिवलीतले खड्डे संपूर्णपणे बुजबण्यात येतील, असं महापौर यावेळी म्हणाले.