Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईत व्यवहारिक मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर सध्या कारवाई (Marathi Compulsory Auto Taxi Driver) सुरु आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाकडून मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांना नोटीसही धाडण्यात आली आहे. याचदरम्यान, मराठी येते की नाही, या तपासणीपासून बचावासाठी काही ऑटो-टॅक्सी चालकांनी रेल्वे स्थानक, मॉल आणि प्रमुख मार्ग टाळण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. (Marathi Compulsory Mumbai)

Continues below advertisement

नेमकं काय घडतंय? (Marathi Compulsory Auto Taxi Driver)

RTO तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज व्हायरल होत आहेत. काही चालकांनी सेवा तात्पुरती बंद केली, तर काहींनी वाहने MMR बाहेर नेल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागांत ऑटो-टॅक्सीची कमतरता जाणवत असल्याचा दावा युनियनने केला आहे. मराठी शिकण्यासाठी पुरेशा सुविधा नसताना शो-कॉज नोटीस बजावल्याचा चालकांचा आक्षेप आहे. नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. राज्यभर गेल्या चार दिवसांत 2500 हून अधिक चालकांना नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात परप्रांतीय रिक्षा चालकांची दादागिरी- (Mumbai Taxi Rickshaw Driver)

मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात परप्रांतीय रिक्षा चालकांची दादागिरी पाहायला मिळत आहे. राज्यात आणि मुंबईत परिवहन विभागाकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शक्ती करण्यात आली आहे. परिवहन विभागाकडून मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईवरुन मराठी भाषा शक्तीविरोधक मुंबईच्या कांदिवली पश्चिम लिंक रोड परिसरात अमराठी रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. परिवहन विभागाविरोधात अमराठी रिक्षा चालकांकडून कांदिवलीत संप पुकारले आहे. अचानक रिक्षा चालक संप पुकारल्यामुळे कांदिवलीत कामासाठी निघालेले चाकरमानी यांचे मोठे हाल होत आहे. कांदिवली पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच मध्यस्थिती करून रिक्षा चालू करण्याचे आवाहन केला. मात्र रिक्षा चालकांमध्ये परिवहन विभागाकडून सुरू असलेली कारवाई विरोधात भीती असल्यामुळे त्यांनी रिक्षा बंद ठेवली आहे.

Continues below advertisement

मराठीचे ज्ञान नसल्यास तीन महिन्यांपर्यंत परवाना निलंबित; सातत्याने नियमभंग केल्यास परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद-

महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या चालकांना प्रवाशांशी प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे ही अट अधिक स्पष्ट करण्यात आली असून, मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्यावरील संबंधित अधिकृतता निलंबित अथवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. शासनाच्या अधिसूचनेनुसार Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये विविध महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमध्ये रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ॲप-आधारित मोटार कॅब आणि त्यांच्या परवाना व अधिकृततेशी संबंधित चालक तसेच परमिटधारकांसाठी व्यवहारिक मराठीच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे.

1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार- (Mumbai Auto Taxi Rate Hike)

मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये पुढील महिन्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ (Mumbai Auto Taxi Rate Hike) होणार आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाडीच्या प्रस्तावाला MMRTA ची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार 1 सप्टेंबर 2026 पासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये होणार आहे. 20 ऑगस्ट रोजी या संबंधीचा परिवहन आयुक्तांनी पाठवलेला  प्रस्ताव MMRTA ने मंजूर केला असून एक सप्टेंबरपासून मुंबई ठाणेनवी मुंबई, कल्याण, वसई, विरार, पालघर या सगळ्या भागासाठी ही भाडेवाढ निश्चित करण्यात आली आहे.याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती. हा प्रस्ताव मुंबई रिक्षा-टॅक्सी युनियन्सनी मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित आहे. यामध्ये इंधन, वाहनांची देखभाल-दुरुस्ती, विमा हप्ते आणि परवाना-संबंधित खर्च यांसारख्या वाढत्या परिचालन खर्चाचा (ऑपरेटिंग खर्च) उल्लेख करण्यात आला आहे.

संबंधित बातमी:

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा