Video : एक मराठा, लाख मराठा घोषणांमध्ये सीएसएमटीला भर रस्त्यात अभूतपूर्व गर्दी अन् पोलिसांनी गांधीगिरी करत दादांना व्हिडिओ काॅल लावला! नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: सीएसएमटीमध्ये मराठा आंदोलकांनी रस्त्यावर जमले.यावेळी मोठी गर्दी सीएसएमटी परिसर झाली होती. त्यामुळे गर्दीला संयमाने बाजूला करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्यासह लाखो समर्थक मुंबईत आझाद मैदानावर पोहोचले आहेत. मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहोचताच समर्थकांमध्ये उत्साह दिसून आला आणि प्रचंड घोषणाबाजी सुरु आहे. आझाद मैदानात आंदोलनासाठी 5 हजार लोकांना परवानगी देण्यात आली होती, परंतु लाखो आंदोलक तिथे पोहोचत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रोटोकॉलनुसार, परवानगीनुसार, 5 हजार लोक एकामागून एक मैदानात जातील, जेणेकरून सर्वांना आंदोलनात सामील होण्याची संधी मिळेल.
भगव्या टोप्या घातलेले मराठा आंदोलक सर्वत्र
दरम्यान, मुंबईतील सीएसएमटी स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, दादर स्टेशन, शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी यासारख्या प्रमुख ठिकाणी भगव्या टोप्या घातलेले मराठा आंदोलक सर्वत्र दिसत आहेत. लोकल गाड्यांमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई मोकळी करण्याचे आदेश देताना मिळेल त्या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने आंदोलकांना वाहने पार्क करण्यास सांगितली आहेत.
दादांचं तुम्हाला ऐकायचं नाही का?
दरम्यान, सीएसएमटीमध्ये मराठा आंदोलकांनी रस्त्यावर जमले.यावेळी मोठी गर्दी सीएसएमटी परिसर झाली होती. त्यामुळे गर्दीला संयमाने बाजूला करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे सीएसएमटी परिसरात पोलिसांनी गांधीगिरी करत आंदोलकांना मनोज जरांगे यांचा व्हिडिओ दाखवत बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यावेळी दादांचं तुम्हाला ऐकायचं नाही का? अशी विचारणा करत त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी केलेल्या विनंतीचा व्हिडिओ दाखवला आणि बाजूला होण्याचे आवाहन केले.
मनोज जरांगे यांनी पोलिसांना आश्वासन दिले
आंदोलनाची परवानगी मिळण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी मुंबई पोलिसांना आश्वासन दिले होते की आंदोलनात सहभागी असलेली कोणतीही व्यक्ती काठ्या, भाले, तलवार किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र सोबत बाळगणार नाही. कोणत्याही गटात द्वेष निर्माण करणारी कोणतीही व्यक्ती प्रक्षोभक भाषण किंवा भाषा वापरणार नाही. आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला किंवा जाळपोळ यासारख्या कोणत्याही कृती होणार नाहीत. तसेच, सर्व सहभागी पोलिसांच्या सूचनांचे त्वरित पालन करतील. याशिवाय, मनोज जरांगे यांनी असेही आश्वासन दिले आहे की कोणत्याही धर्माचा किंवा वर्गाचा अपमान केला जाणार नाही आणि धार्मिक स्थळांचा किंवा पवित्र वस्तूंचा नुकसान केला जाणार नाही. आंदोलनस्थळावरून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला जाणार नाही.
'जर काही चूक झाली तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा'
मनोज जरांगे यांनी पोलिसांना स्पष्टपणे सांगितले होते की, आंदोलकांना नियंत्रणात ठेवणे ही माझी आणि आयोजकांची जबाबदारी असेल. जर आम्ही असे करण्यात अयशस्वी झालो तर माझ्यावर आणि आयोजकांवर गुन्हा दाखल केला जाईल. शपथपत्रात लिहिलेले सर्व नियम पाळले जातील आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या


















