Manoj Jarange Bombay High Court Hearing: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनासंदर्भात आज (2 सप्टेंबर) पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, 3 पर्यंत सगळं सुरळीत झालं पाहिजे अन्यथा कोर्टाचा अवमान केला म्हणून कारवाई करु, असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत. तसेच आज दुपारी 3 वाजता पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणात आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कालच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक आणि राज्य सरकार, पोलीस यांच्यावर ताशेरे ओढले होते. तसेच 24 तासांत आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व परिसर खाली करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी नामवंत विधिज्ञ सतीश मानेशिंदे यांनी मराठा समाजाची बाजू न्यायालयासमोर मांडली. त्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांकडून झालेल्या त्रासाची मी मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने माफी मागतो, असे सांगितले. मात्र, सरकारने आमच्यासाठी कुठेही नागरी सुविधांची व्यवस्था केली नव्हती. 5000 लोकांची परवानगी होती, पण पार्किंगची व्यवस्था फक्त 500 लोकांसाठी होती. इतर लोक हे स्वत:हून आले होते, असे सांगत सतीश मानेशिंदे यांनी मराठा आंदोलकांचा बचाव केला.
उच्च न्यायालयाचा सतीश मानेशिंदे यांना प्रतिसवाल-
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मराठा आंदोलकांचे वकील सतीश मानेशिंदे यांना प्रतिसवाल केला. जेव्हा मुंबईत 5000 पेक्षा जास्त लोक आले आहेत, हे कळाले तेव्हा तुम्ही काय काळजी घेतली. तुम्ही प्रेस नोट काढली होती का? तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर सांगितले का, लोक जास्त झाली आहेत. न्यायाधीशांना पायी चालत यायची पाली आली म्हणून आम्ही राज्य सरकारशी देखील संतुष्ट नाही. त्यांनी तत्काळ जागा खाली करावी त्यांच्याकडे परवानगी नाही नाही तर, अन्यथा आम्ही तीन वाजता आदेश देणार, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तुम्ही अशाप्रकारे जागा अडवू शकत नाही.
आझाद मैदानावरील आंदोलक काय म्हणाले?
आम्ही शांततेत आंदोलन करतो, पण आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. आम्ही शेतकरी आहे, आम्हाला काय काम नाहीत काय? मराठ्यांचा देव इथे बसले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हलणार नाही. कोर्टाला, शासनाला किती महिने झाले टाईम देऊन, आज तुम्ही 3 वाजेपर्यंत टाईम दिला. आम्ही 3 महिने टाईम दिला, 13 महिने टाईम दिला. तुम्हाला 3 महिने अगोदर सांगूनसुध्दा जाग येत नाही. आम्ही माघारी जाणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे, असं एक मराठा आंदोलक म्हणाला. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, आम्हाला गोळ्या घातल्या तरी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही शांततेत आंदोलन करू, आम्हालाही गावाकडं कामं आहेत, शेतात कामं आहेत. पण, आरक्षणाचा निर्णय आजपर्यंत का घेतला नाही, असा सवालही आझाद मैदानातून आंदोलक विचारत आहेत.
आजच्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय काय घडलं?
जेष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे मराठा आंदोलकांकडून बाजू मांडली-
सतीश मानेशिंदे काय म्हणाले?
- जे काही आंदोलनकर्त्यांकडून त्रास झाला त्याची जरांगे यांच्या वतीने माफी मागतो.
- मात्र आमच्यासाठी कोणतीही सोय करण्यात आली नाही.
- 5000 लोकांची परवानगी होती मात्र केवळ 500 जणांच्या पार्किंगची सोय करण्यात आली.
- इतर लोक स्वतःहून आले होते.
मुंबई उच्च न्यायालय काय म्हणाले?-
- तुम्ही लोकांना सांगितलं होतं का केवळ 5000 जणांना परवानगी आहे याची काय काळजी घेतली का मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल...
- तुम्ही प्रेस नोट काढली का?
- तुम्ही मिडिया च्या माध्यमाने आव्हान केलं का की लोक जास्त झाली आहेत.
मराठा आंदोलनकर्त्यांचे मानेशिंदे काय म्हणाले?
- आम्ही माध्यमांमार्फत लोकांना सांगितलं - वकिलांचा दावा
उच्च न्यायालय काय म्हणाले?-
- आम्ही राज्य सरकार शी देखील संतुष्ट नाही.
- न्यायाधिशांना पायी चालत यायची पाळी आली म्हणून आम्ही राज्य सरकारशी देखील संतुष्ट नाही.
उच्च न्यायालय काय म्हणाले?-
- त्यांनी तत्काळ जागा खाली करावी त्यांच्याकडे परवानगी नाहीतर, आम्ही तीन वाजता आदेश देणार मुंबई उच्च न्यायालय
- आंदोलनकर्त्यांना इशारा
- तुम्ही जागा अडवू शकत नाही
- काहीही अडचण असली तरी तुम्हाला वेळ देत आहोत राज्य आणि आंदोलनकर्त्यांना- उच्च न्यायालय
- उच्च न्यायालय अशा प्रकारे घेरता येऊ शकत नाही
- राज्य आणि आंदोलनकर्त्यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
- राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाच पालन होण्यासाठी कोणती पावलं उचलली
- उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला सवाल
- काल मी विमानतळावरून परतता होतो एकही पोलिसांची गाडी रस्त्यावर नव्हती
- तुमच्या पोलीस व्हॅन कुठे होत्या आम्हाला माहिती द्या
- तीन वाजेपर्यंत माहिती द्या नाही तरी आम्ही कारवाई करणार
- कायद्यात जे काही आहे त्यानुसार आम्ही कारवाई करणार कोर्टाच्या अवमान केला तर कारवाई करणार
आंदोलनकर्त्यांचे वकील मानेशिंदे काय म्हणाले?-
- आम्ही शांत आहोत आम्ही कायद्याचं पालन करतोय.
उच्च न्यायालय काय म्हणाले?
- स्थानिकांना शांततेत राहू द्या...
- लोकांच्या मनात भीतीच वातावरण आहे ते घराबाहेर पडू शकत नाहीत.
- तीन वाजेपर्यंत आम्हाला सगळं सुरळीत हवंय..
- अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ..
कोर्टाच्या आजच्या सुनावणीतील 5 मोठे मुद्दे
1) तीन वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा, राज्य सरकार आणि आंदोलकांना निर्देश2) सरकारच्या भूमिकेने संतुष्ट नाही- कोर्ट3) मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालणं योग्य नाही4) आंदोलकांकडे परवानगी नाही तर तात्काळ आझाद मैदान खाली करावं, जागा अडवू शकत नाहीत5) तीनपर्यंत कार्यवाही झाली नाही तर कोर्ट स्वत: रस्त्यावर उतरून आढावा घेणार
मराठा आंदोलकांनी कोर्टात काय भूमिका मांडली?
1) आंदोलकांकडून जर त्रास झाला असेल तर माफी मागतो, पण आंदोलकांची कोणतीही सोय झाली नाही
2) 5 हजार आंदोलनकर्त्यांना परवानगी दिली पण 500 लोकांच्या पार्किंगचीही सोय केली नाही
3) मीडियाच्या माध्यमातून अतिरिक्त गर्दी वाढल्याची माहिती आंदोलकांना दिली
4) आम्ही शांत आहोत आम्ही कायद्याचं पालन करतोय
कोर्टाचे सरकारला आदेश काय?
1) दुपारी तीनपर्यंत सगळं सुरळीत करा, दक्षिण मुंबई रिकामी करा2) अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा 3) कोर्टाचा अवमान केल्यास कारवाई करु4) स्थानिकांना शांततेत राहू द्या, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ते घराबाहेर पडू शकत नाहीत.