Traffic Route Changes in Mumbai: मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं (New Year 2024) स्वागत करण्यासाठी संपूर्ण मुंबापुरी (Mumbai News) सज्ज झाली आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच नववर्षाच्या निमित्तानं सर्व काही सुरळीत होण्यासाठी प्रशासनंही पुर्ण तयारीत आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक कोंडी (Traffic Congestion) आणि गर्दी (Crowd) टाळण्यासाठी. मुंबई पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी मुंबईतील गिरगाव, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये वाहतुकीत आणि पार्किंगच्या व्यवस्थेत काही बदल केलेले आहेत.
मुंबईत वाहतुकीत करण्यात आलेले सर्व बदल सविस्तर
वाहतुकीतले बदल : 31 डिसेंबर दुपारी दोन वाजल्यापासून ते एक जानेवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गिरगाव चौपाटी परिसरातील जुहू तारा रोड आणि वैकुंठलाल मार्ग हा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा डॉ . श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (रिगल जंक्शन) ते गेट वे महाराज मार्ग ऑफ इंडिया मार्गे दि बॉम्बे प्रेसिडेन्सी क्लब (रेडिओ क्लब) कडे जाण्याकरता दक्षिण वाहिनी आणि त्याच मार्गानं परत येण्याकरता (उत्तर वाहिनी) अशा दोन्ही वाहिनी आपत्कालीन सेवेतील वाहनं वगळून इतर सर्व वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग : अॅडम स्ट्रिट पर्यायी मार्ग पी. रामचंदानी मार्ग पर्यायी मार्ग के.एस. धारीया चौक (बेस्ट जंक्शन) पर्यायी मार्ग लोकांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठीचे ठिकाण शहीद भगतसिंह मार्गे डावे वळण महाकवी भूषण मार्ग उजवे वळण, बोमन बेहराम मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.
वाहतुकीतले बदल : महाकवी भूषण मार्ग आणि बोमन बेहराम मार्ग जंक्शन येथून अॅडम स्ट्रिट मार्गे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग रिगल जंक्शनकरता जाणाऱ्या वाहनांना आपत्कालीन सेवेतील वाहनं आणि बेस्ट बसेस वगळून इतर सर्व वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग : के . एस . धारिया महाकवी भूषण मार्गे उजवे वळण, बोमन बेहराम मार्गे उजवे वळण-चौक (बेस्ट जंक्शन) उजवं वळण, शहीद भगतसिंह मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.
वाहतुकीतले बदल : दि बॉम्बे रेसीडेन्सी क्लब ( रेडीओ क्लब ) येथून अॅडम स्ट्रिट कडे येणाऱ्या वाहनांना आपत्कालीन सेवेतील वाहने वगळून इतर सर्व वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग : दि बॉम्बे रेसीडेन्सी क्लब (रेडीओ क्लब) येथून हाजी नियाझ आझमी मार्ग जगन्नाथ जे . पालव चौक (भिडभंजन मंदिर) उजवे वळण शहीद भगतसिंह मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.
वाहतुकीतले बदल : श्रीमती वा अल्या चौकाकडुन पी . रामचंदानी कडे जाणेकरीता आपत्कालीन सेवेतील वाहने वगळून इतर सर्व वाहतूकीस बंद राहील .
पर्यायी मार्ग : के . एस . धारिया चौक ( बेस्ट जंक्शन ) श्रीमती वायलट अल्वा चौक उजवे वळण बोमन बेहराम मार्ग हाजी नियाझ आझमी मार्ग डावे वळण दि बॉम्बे प्रेसीडेन्सी क्लब (रेडीओ क्लब)
शहीद भगतसिंह मर्गावर विस्तारीत आमदार निवासासमोर 2 एमजी रोडवर जहांगीर आर्ट गॅलरीसमोर सर्व प्रकारच्या वाहनांना 'नो पार्किंग'
वाहतुकीतले बदल : महाकवी भूषण मार्ग, बेस्ट मार्ग, हेन्री रोड, बी . के . बोमन बेहराम मार्ग, हाजी नियाज आझमी मार्ग या पर्यायी मार्गावर दिनांक 31/12/2023 रोजी 06 वाजल्यापासून दिनांक 01/01/2024 रोजी पहाटे 06 वाजेपर्यत पार्किंग करण्यास बंद राहील.
हुतात्मा राजगुरु चौक ( मंत्रालय जंक्शन ) ते वेणुताई चव्हाण चौक ( एअर इंडीया जंक्शन ) पर्यत उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
महर्षी कर्वे रोड मार्गे रामनाथ पोददार चौक (गोदरेज जंक्शन) अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) - मरीन लाईन्स चर्नी रोड- पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस जंक्शन) मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील . बॅरीस्टर रजनी पटेल मार्ग हा साखर भवन जंक्शन येथुन एन . एस रोडला येणारी उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
जमनालाल बजाज मार्ग ते मुरली देवरा चौक असा उत्तर वाहीनीने एन . एस . रोडकडे जाणारा विनय के शहा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
पर्यायी मार्ग : रामनाथ गोएका मार्ग साखर भवन जंक्शन उजवे वळण बॅरीस्टर रजनी पटेल मार्गाने फि प्रेस सर्कल- पुढे इच्छित स्थळी जातील.