Maharashtra August Rain updates: मान्सूनच्या उत्तरार्धात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची अपेक्षा आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता ऑगस्ट महिन्यात वर्तवण्यात आली आहे. तसे घडल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलास मिळेल. (Monsoon latest news) 

Continues below advertisement

दरम्यान, जुलै महिन्याच्या शेवटाला विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला असला तरी 1 जूनपासून सरासरी देखील गाठता आलेली नाही. विदर्भात 1 जूनपासून सरासरीच्या 95 टक्के पाऊस पडला आहे तर मराठवाड्यात सरासरीच्या 92 टक्के पावसाची नोंद झाली आहे. कोकणात पावसाने सरासरी गाठली असून 101 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सोबतच, मध्य महाराष्ट्र 1 जूनपासून सरासरीच्या 125 टक्के पाऊस झाला आहे. 

विदर्भात 31 जुलैपर्यंत सरासरी 484.7 मिमी पाऊस होतो, मात्र यंदा 462.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात 305.1 मिमी पाऊस होतो, मात्र, आतापर्यंत जुलै महिन्यात 281.7 मिमी पाऊस झाला आहे. याउलट मध्य महाराष्ट्रात 387.2 मिमी सरासरी पाऊस होत असतो. मात्र यंदा चांगला पाऊस झाला असून 483.4 मिमी पाऊस कोसळला आहे. कोकणात देखील सरासरी 1755 मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा जुलै महिन्यात 1767.5 मिमी पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुलनेनं कमी पाऊस झाला आहे, ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी गाठली जाते का? हे बघणे महत्त्वाचे असेल

Continues below advertisement

Fishing season: पश्चिम सागरी किनारपट्टीवर मासेमारीला सुरुवात

देशाच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवर सर्वच राज्यात आजपासून मासेमारी सुरू झाली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांना आजपासून पुढील 15 दिवस 12 सागरी मैलापलिकडील राष्ट्रीय सागरी क्षेत्रात मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मात्र 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी असल्याने राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करण्यास परवानगी नाही. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना मच्छीमारांना मयदिचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.12 सागरी मैलापलिकडील राष्ट्रीय हद्दीत मासेमारीस परवानगी देण्यात आली असली तरी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी लागू राहणार आहे. त्यामुळे सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी होणार नाही कशावरून आणि झालीच तर त्यावर कारवाई करण्यासाठी मत्स्य विभागाची गस्ती नौका सज्ज आहे का, हा सवाल पारंपरिक मच्छीमारांमधून उपस्थित होत आहे.

Satara Rain: धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात 4,966 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. धोम धरणातून 4966 इतका पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रात करण्यात आला आहे..धोम धरण सध्या 89 टक्के भरले आहे. वाईतील ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गणरायाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचले आहे. कृष्णा नदीवरील पूल धोक्याच्या पातळीवर असून, शहरातील प्रसिद्ध कृष्णा घाटासह सर्व घाट जलमय झाले आहे.. वाईच्या पुलावरून सध्या विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची वर्दळ वाढली आहे पुराचे पाणी पुलाला जाऊन पोचले आहेत..जीव मुठीत धरून नागरिक यावरून प्रवास करत आहेत.. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी नदीपात्र, घाट आणि पाण्याखाली गेलेल्या पुलांवर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

आणखी वाचा

पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा