Maharashtra Politics Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोरे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे गट आता स्वत: ची कार्यकारणी तयार करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडत आहे. या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना खासदारांमध्ये झालेली फूट म्हणजे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाणार आहेत. या दिल्ली दौफऱ्.ा
शिंदे गट स्वत: ची कार्यकारणी स्थापन करणार ?
शिवसेनेत बंडखोरी सुरू झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिंदे गटात असलेल्या आमदारांना, त्यांच्या जवळील पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. काहींची हकालपट्टीदेखील करण्यात आली होती. कारवाईच्या या पार्श्वभूमीवर आमदारांच्या बैठकीत काही आमदार प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटातील ज्या पदाधिकाऱ्यांची ज्या पदांवरून हकालपट्टी झाली होती, त्यांना त्याच पदावर नियुक्त करण्यात येणार आहे.
खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे.