Kirit Somayaa on Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून भाजप, ईडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांमागे केंद्रीय यंत्रणांचा सपाटा लागल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहयला मिळत आहे. आता याप्रकरणाला आणखी एक नवं वळण लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांनी किरीट सोमय्या देशद्रोही असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याचे राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना द्यावे, असं अव्हान किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. 


भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "संजय राऊतांनी आतापर्यंत सतरा आरोप केले. किरीट सोमय्यानं विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा करुन अमित शाहांना दिले, त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यानं निल सोमय्यांच्या पालघरचा भूखंडात कोट्यवधी रुपये गुंतवले, यांसारखे सतरा आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी दीड महिन्यापूर्वी SIT स्थापन केली. काय निष्पन्न झालं. एकही पुरावा संजय राऊतांनी दिला नाही, असं कोर्टात मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "ठाकरे सरकारचे एकापाठोपाठ एक घोटाळे बाहेर येत आहेत. त्यात आता संजय राऊतांचा नंबर आला. त्यामुळे काहीही आरोप करायचे?"


"संजय राऊत किरीट सोमय्याला देशद्रोही कालपर्यंत दलाल, आणि काय-काय शिवीगाळ करत होते. कितीही अपशब्द वापरले तरी महाराष्ट्रासाठी सगळं काही सहन करेन. त्यांची मनस्थिती समजू शकतो. संजय राऊत आणि त्यांच्या सुजित पाटकर मित्राची चौकशी करावी.", असंही किरीट सोमय्या म्हणाले. 


दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवायांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. त्यावरुन वारंवार विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. केंद्रात सत्ता असलेलं भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता. यामध्ये प्रामुख्यानं एक नाव आघाडीवर होतं, ते म्हणजे संजय राऊत. काल संजय राऊतांच्या संपत्तीवरही ईडीनं टाच आणली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :