BEST Electricity Tariff:  महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानंतर राज्यातील वीज कंपन्यांनी वीज दरात वाढ केली आहे. एप्रिल महिन्यापासून वीज दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने तीन वर्षांसाठी वीज दरवाढ जाहीर केली आहे. मुंबई शहरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आपल्या दोन वर्षांसाठीचे दर जाहीर केले आहेत. 


बेस्टने वीज दरवाढीबाबतची माहिती दिली आहे. बेस्टने आर्थिक वर्ष 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षातील दर जाहीर केले आहेत. या दरानुसार, बेस्टच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के तर 2024-25 साठी 6.35 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.


वर्ष 2023-24 मध्ये दर कसा असणार?


दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी स्थिर आकार हा 11 रुपये असणार आहे. तर, प्रति युनिट दर 1.50 रुपये असणार आहे. व्हिलिंग चार्ज 1.74 रुपये  इतका दर असणार आहे. 


100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी 85 रुपये स्थिर मागणी आकार असणार आहे. तर, 1.95 रुपये प्रति युनिट दर आहे. व्हिलिंग चार्ज 1.74 रुपये असणार आहे. 101 ते 300 युनिटचा वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी स्थिर दर 125 रुपये असणार आहे. तर, 5.30 रुपये प्रति युनिट दर असणार आहे. 301 ते 500 पर्यंत विजेचा वापर करणाऱ्यांना प्रति युनिट 8.89 रुपये प्रति युनिट दर असणार आहे. तर 500 हून अधिक युनिटचा वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना 10.86 रुपये प्रति युनिट दर असणार आहे. 


वर्ष 2024-25 मध्ये किती असणार दर?


वर्ष 2024-25 मध्ये वीज ग्राहकांना 6.35 टक्के अधिक दर मोजावा लागणार आहे. 


दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी स्थिर आकार हा 12 रुपये असणार आहे. तर, प्रति युनिट दर 1.87 रुपये असणार आहे. व्हिलिंग चार्ज 1.97 रुपये  इतका दर असणार आहे. 


100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी 90 रुपये स्थिर मागणी आकार असणार आहे. तर, 1.87 रुपये प्रति युनिट दर आहे. व्हिलिंग चार्ज 1.97 रुपये असणार आहे. 101 ते 300 युनिटचा वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी स्थिर दर 135 रुपये असणार आहे. तर, 5.46 रुपये प्रति युनिट दर असणार आहे. 301 ते 500 पर्यंत विजेचा वापर करणाऱ्यांना प्रति युनिट 9.56 रुपये प्रति युनिट दर असणार आहे. तर 500 हून अधिक युनिटचा वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना 11.73 रुपये प्रति युनिट दर असणार आहे. या ग्राहकांसाठी स्थिर आकार हा 160 रुपये असणार आहे. 


बेस्टने जाहीर केलेले हे वीज दर कोणत्याही करांशिवाय आहेत. त्यामुळे इंधन समायोजन कर आणि इतर बाबींवरील कर वगळता आहेत.