मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 664 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 915 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 85 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
राज्यात आज 16 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7 हजार 132 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 79 हजार 919 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 881 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 58 , 39, 289 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 186 रुग्णांची भर तर तीन जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 186 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 210 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 1886 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,42,602 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1886 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.02 टक्के इतका झाला आहे.
देशात 24 तासांत 9 हजार 216 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद
जगाची धाकधूक वाढवणाऱ्या ओमायक्रॉनचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव (Coronavirus) सुरुच आहे. अशातच काल (गुरुवारी) देशात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याचं निष्पन्न झालं. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 216 नव्या दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊयात सध्याची कोरोनास्थिती... केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 99 हजार 976 सक्रिय रुग्ण आहेत. या महामारीमध्ये 4 लाख 70 हजार 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 45 हजार 666 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.