Maharashtra CM Eknath Shinde : गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिंना वंदन केलं. त्यानंतर ते ठाण्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत. ठाण्यात आनंद दिघे यांच्या स्मृतिंना ते वंदन करणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच इतक्या मोठ्या पदापर्यंत सर्वसामान्य शिवसैनिक पोहोचू शकलेला आहे, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार आम्ही पुढे नेतोय. महाराष्ट्राचा विकास हेच युती सरकारचं ध्येय आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "गुरुपौर्णिमेनिमित्त आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी त्यांना वंदन केलं. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री झाला. बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छांमुळेच सर्व घडामोडी शक्य झाल्या आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबतचे 50 आमदार करत आहोत. बाळासाहेबांनी नेहमीत सर्वसामान्यांना काम देण्याचं काम केलं आहे. मराठी माणसांना आणि हिंदूंना ताठ मानेनं जगण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली. म्हणून त्यांच्याच आशीर्वादानं आम्ही काम करतोय. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आणि राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचं काम आमचं युती सरकार करणार आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा उत्कर्ष करण्याचं आमचं ध्येय आहे."
गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देत वंदन केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी ठाणेच्या दिशेनं रवाना झाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :