मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सुतोवाच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत दिले. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक मंत्र्यांचे खांदेपालट होणार आहेत, तर जवळपास 6 मंत्र्यांचं खातं जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे फडणवीस सरकारमधील मराठा चेहरा असलेल्या एका मंत्र्याला तामिळनाडूचं राज्यपालपद देण्याची चर्चा सध्या भाजपमध्ये सुरु आहे.
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडेच तामिळनाडूचंही राज्यपालपद आहे. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त भार कमी करुन महाराष्ट्रातील मराठा मंत्र्याला तामिळनाडूचं राज्यपालपद देऊन, ‘साईडट्रॅक’ करण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत.
त्यामुळे चर्चेत असलेला हा मराठा मंत्री कोण, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सध्या फडणवीस सरकारमध्ये भाजपचे आघाडीचे मराठा चेहरे म्हणून चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, संभाजी पाटील-निलंगेकर, सुभाष देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं.
पण आघाडीच्या मंत्र्यांना वगळता अन्य मराठा मंत्र्यांना राज्यपालपदी धाडण्याची सूतराम शक्यता नाही. शिवाय संभाजी पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री असल्याचं जाहीर सांगितलं होतं, त्यामुळे ते सुद्धा मंत्रिमंडळात राहणार हे जवळपास निश्चित आहे.
राहिला प्रश्न चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांचा. तर चंद्रकात पाटील हे थेट भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून हलवण्याची शक्यता नाही.
दुसरीकडे चर्चा येऊन थांबते ती विनोद तावडे यांच्या नावावर. तावडे यांचा पदवीचा वाद, शिक्षकांची नाराजी आणि सध्याचा मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ, यामुळे त्यांच्या नावाची चर्चा भाजपमधीलच त्यांच्या स्पर्धकांनी सुरु केली की काय असा प्रश्न आहे.
संबंधित बातम्या
मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप
मराठा मोर्चा : मागण्या काय आणि मिळालं काय?
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तामिळनाडूच्या राज्यपालपदासाठी चर्चेत असलेला मराठा मंत्री कोण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2017 01:50 PM (IST)
फडणवीस सरकारमधील मराठा चेहरा असलेल्या एका मंत्र्याला तामिळनाडूचं राज्यपालपद देण्याची चर्चा सध्या भाजपमध्ये सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -