मुंबई : महाविकास आघाडीतील मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या 23 जागांपैकी शिवसेना ठाकरे गट 13, कांग्रेस 8 , राष्ट्रवादी 1 आणि समाजवादी 1 या जागेवर सर्वांचं एकमत झाल्याची माहिती आहे. घाटकोपर पूर्वची जागा राष्ट्रवादी पवार गटाला तर शिवाजीनगरची जागा समाजवादी पार्टीला मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 


विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची मॅथेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला असून उरलेल्या 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहावं लागेल. वांद्रे पूर्व जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा आहे. दोन पक्षांमध्ये ती जागा अडचणीची ठरण्याची शक्यता


शिवसेना ठाकरे गटाला कोणत्या जागा मिळणार? 



  • विक्रोळी विधानसभा

  • भांडुप पश्चिम विधानसभा

  • दिंडोशी विधानसभा

  • अंधेरी पूर्व विधानसभा

  • चेंबूर विधानसभा

  • कलिना विधानसभा

  • वरळी विधानसभा

  • शिवडी विधानसभा


काँग्रेसला मिळणाऱ्या जागा



  • मालाड पश्चिम विधानसभा

  • धारावी विधानसभा

  • मुंबादेवी विधानसभा

  • वांद्रे पश्चिम

  • चांदीवली विधानसभा

  • कांदिवली पूर्व


महाविकास आघाडीकडून सलग तिसऱ्या दिवशी जागावाटपासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 150 जागांवर तीनही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित जागांवर चर्चा अद्याप सुरू आहे. 


महायुतीची चर्चा सुरू, अजितदादा अतिरिक्त 10 जागांसाठी आग्रही


महायुतीत अजितदादांच्य़ा राष्ट्रवादीला विधानसभेच्या अतिरिक्त 10 जागा हव्या आहेत. या जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी अमित शहांची भेट घेतल्याचीही माहिती आहे. जागावाटपाच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्याकडून जास्त जागा मिळणार नसल्याची शंका कदाचित अजित पवारांच्या राष्ट्रवादीला असल्यामुळे आता थेट अमित शहांसोबत भेटी-गाठी करून अधिकच्या जागा मिळवण्याचा हा प्रयत्न दिसतोय. त्यामुळे विधानसभेच्या वेळी जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी दादा गट आग्रही आहे. 


भाजप कार्यकर्त्यांकडून दीडशेपेक्षा जास्त जागांचा आग्रह आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून शंभर ते सव्वाशे जागांची मागणी होत आहे. त्यामुळे महायुतीतला हा तिढा कसा सुटेल आणि अमित शाह कोणता मार्ग काढणार याची उत्सुकता आहे. 


ही बातमी वाचा: