वरळी येथील दोन सी-फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंट हे एकूण 22,572 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे अपार्टमेंट वरळी सी फेसवरील Naman Xana या 40 मजली इमारातीत आहेत. 32व्या आणि 35व्या मजल्यावरील दोन अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंटमध्ये अलिशान सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
63.9 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी-
घराची किंमत तब्बल 639 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये तब्बल 63.9 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीसाठी लागणार आहे. कार्पेट एरियाच्या आधारावर याची किंमत 2.83 लाख प्रति चौरस फूट इतकी प्रचंड आहे.
कोण आहेत मालक?
युएसव्ही फार्मा कंपनीच्या चेअरमन लीना गांधी तिवारी यांनी हे 32व्या आणि 35व्या मजल्यावरील दोन अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट 639 कोटींत विकत घेतले आहेत. लीना गांधी तिवारी ही यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांची नात आहे. तिच्या आजोबांनी 1961 मध्ये रेव्हलॉनसोबत ही कंपनी स्थापन केली. आज ती देशातील एक आघाडीची औषधनिर्माण आणि जैव-तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीचे उत्पन्न सुमारे 511 दशलक्ष डॉलर्स आहे. ही कंपनी मधुमेह आणि हृदयरोगाशी संबंधित औषधे बनवणाऱ्या भारतातील पहिल्या पाच कंपन्यांपैकी एक बनली आहे. लिनातिवारी भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. फोर्ब्सच्या मते, 29 मे 2025 पर्यंत लिना गांधी यांची रिअल-टाइम नेट वर्थ $3.9 अब्ज आहे. ती सध्या जगातील 964 व्या श्रीमंत व्यक्ती आहे. 2023 मध्ये, फोर्ब्स इंडियाने तिला 45 व्या श्रीमंत भारतीय महिला म्हणून यादीत नोंद केली होती.