मुंबई : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 4 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.


http://mumbai.11thadmission.net/ या वेबसाईटवर अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दोन टप्प्यात ही अॅडमिशनची प्रक्रिया पार पडणार आहे.

गुणवत्ता यादीसाठी भाग एक आणि भाग दोन मंजुरीसह पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचेच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ज्यांचे अर्ज अपूर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाणार नाही.

विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर 'माय स्टेटस' तपासून पाहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक!

- ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा - 16 ते 27 जून

- सर्वसाधारण यादी जाहीर होण्याची तारीख - 30 जून, संध्याकाळी 5 वाजता

- अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची तारीख - 1 ते 3 जुलै, संध्याकाळी 5 वाजता

* पहिली यादी

- पहिली गुणवत्ता यादी - 7 जुलै, सायंकाळी 5 वाजता

- पूर्ण फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 8, 10, 11 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत

* दुसरी यादी

- दुसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख - 12 ते 13 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत

- दुसरी गुणवत्ता यादी - 17 जुलै, संध्याकाळी 5 वाजता

- फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 17 ते 19 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता

* तिसरी यादी

- तिसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंती क्रम बदलण्याची तारीख - 20 ते 21 जुलै, संध्याकाळी 5 वाजता

- तिसरी गुणवत्ता यादी - 25 जुलै, संध्याकाळी 5 वाजता

- फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 26 ते 27 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता

* चौथी यादी

- चौथ्या यादीसाठी आवश्यक असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख - 28 ते 29 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत

- चौथी गुणवत्ता यादी - 1 ऑगस्ट, संध्याकाळी 5 वाजता

- फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 2 ते 3 ऑगस्ट, सकाळी 10 ते 5 वाजता

कट ऑफमध्ये वाढ होण्याची शक्यता

यंदा मुंबईतील पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही आहेत. तर 10 हजार 157 विद्यार्थ्यांना 90 आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यातही 95 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी यंदाच्या नामांकित कॉलेजची सायन्सची कटऑफ 93 टक्क्यांपर्यंत बंद होण्याचा अंदाज आहे.

अकरावी प्रवेशाबाबत ए टू झेड माहिती


अकरावीच्या उपलब्ध जागा

- अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा - 1 लाख 32 हजार 408

- ऑनलाईन प्रवेश - 1 लाख 59 हजार 682

- एकूण जागा - 2 लाख 92 हजार 90

2016 मधील कट ऑफ

कला : जास्तीत जास्त 94.4% ते कमीत कमी 80%

वाणिज्य : जास्तीत जास्त 94.5 % ते कमीत कमी 89.8%

विज्ञान : जास्तीत जास्त 93.2 % ते कमीत कमी 91%