एक्स्प्लोर

Lalbaugcha Raja Crime: लालबागचा राजा मंडळानंतर आता पोलीस आक्रमक, 'ते' रिल तयार करणाऱ्या फोटोग्राफरवर गुन्हा दाखल

Lalbaugcha Raja Visarjan: लालबागचा राजाच्या विसर्जनाला यंदा प्रचंड उशीर झाला होता. सकाळी आठ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला. मात्र, त्याचे विसर्जन रात्री नऊ वाजता झाले.

Lalbaugcha Raja Darshan: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा प्रचंड टीकेचे धनी ठरले होते. लालबागचा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या सामान्य भाविकांना एक न्याय आणि श्रीमंत, व्हीआयपी, सेलिब्रिटींना वेगळी विशेष वागणूक दिली जाते, असा आरोप झाला होता. त्यामुळे लालबागचा राजा मंडळ (Lalbaugcha Raja 2025) आणि कार्यकर्त्यांची प्रचंड नाचक्की झाली होती. या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा मंडळ हे आक्रमक झाले होते.  त्यांनी एका कोळी बांधवाला न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांबाबत (Mumbai Police) गैरसमज निर्माण करणारे रिल (Reel) तयार केल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लालबागच्या विसर्जनाला विलंब झाल्यानंतर सोशल मिडियावर अनेकांनी रिल्सच्या माध्यमातून त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान लालबाग राजाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर रिल बनवल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालबाग राजाच्या विसर्जनादरम्यान पोलिस गर्दीतून राजाची वाट मोकळी करत असताना फोटोग्राफरने आपल्या रिलमध्ये चुकीचा मेसेज देत तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. या व्हिडिओत प्रामुख्यान लालबाग राजाचे दर्शन श्रीमंतांसाठी सोईस्कर आणि सर्व सामान्यांसाठी खडतर अशाप्रकारे दाखवण्यात आले होते. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी समाज माध्यमात खोटी व बदनामीकारक विधान केल्याने पोलिसांनी संबधितावर गुन्हा दाखल केला आहे. लालबागचा राजाच्या विसर्जनाला यंदा प्रचंड उशीर झाला होता. रविवारी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर दीड-दोन तासांमध्ये त्याचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, लालबागचा राजाचे विसर्जन होण्यासाठी रात्रीचे नऊ वाजले होते.

Lalbaugcha Raja 2025: लालबागचा राजा मंडळाकडून पहिली अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला न्यायालयात खेचणार

लालबागचा राजा मंडळ (Lalbaugcha Raja Visarjan 2025) गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर (Hiralal Wadkar) यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. समुद्राला मोठी भरती असल्याने लालबाग राजाचे विसर्जन रविवारी (7 सप्टेंबर) विलंबाने झाले. या सगळ्याबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून मंडळाची बदनामी केली. त्यामुळे वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय लालबाग राजा मंडळाने घेतला होता.

हिरालाल वाडकर यांनी 7 सप्टेंबरला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबाबत गंभीर आरोप केले होते. आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षापासून लालबाग राजाचे विसर्जन करत आहोत. यंदा मात्र मंडळाने गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिले आणि गणित चुकले. परिणामी लालबागचा राजाच्या विसर्जनाला इतका विलंब झाला, असा दावा हिरालाल वाडकर यांनी केला होता. मात्र, हिरालाल वाडकर यांचा हा दावा सपशेल खोटा आहे. केवळ प्रसिद्धी आणि बदनामीच्या हेतूने हिरालाल वाडकर व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचे लालबागचा राजा मंडळाकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा

लालबागचा राजा मंडळाकडून पहिली अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला न्यायालयात खेचणार, नेमकं काय घडलं?

लालबागचा राजाचा तराफा गुजरातचा नव्हताच, मग कुठे तयार केलेला?; मंडळाने अखेर सगळं सांगितलं!

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Corporators Fund : 12 वर्षांनंतर मुंबईतील नगरसेवकांच्या निधीत मोठी वाढ! आता 60 लाखांऐवजी मिळणार वार्षिक 'इतक्या' कोटींचा निधी
12 वर्षांनंतर मुंबईतील नगरसेवकांच्या निधीत मोठी वाढ! आता 60 लाखांऐवजी मिळणार वार्षिक 'इतक्या' कोटींचा निधी
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
Ganeshotsav Toll Waiver : गणेशभक्तांसाठी खूशखबर! मुंबई-गोवा, अटल सेतूसह मुंबई-बंगळुरू महामार्गावर टोल माफी, 'असा' मिळवा फ्री पास
गणेशभक्तांसाठी खूशखबर! मुंबई-गोवा, अटल सेतूसह मुंबई-बंगळुरू महामार्गावर टोल माफी, 'असा' मिळवा फ्री पास

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
Embed widget