एक्स्प्लोर

lalbaugcha raja ganpati visarjan : लालबागच्या राजाचं विसर्जन, फटाक्यांची आतषबाजी करत भक्तांच्या जनसागराच्या साक्षीनं लाडक्या राजाला निरोप

lalbaugcha raja ganpati visarjan : लालबागच्या राजा विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफ्यावरुन अरबी समुद्रात दोन ते तीन किलोमीटर आत गेल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं.

मुंबई :  मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जन करण्यात आलं आहे. लालबागच्या राजाच्या मूर्तीची उत्तर आरती झाल्यानंतर मंडळाचे पदाधिकारी आणि अनंत अंबानी यांच्या उपस्थितीत अत्याधुनिक तराफा अरबी समुद्रात दोन ते तीन किलोमीटर आत गेल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. अत्याधुनिक तराफ्यावरुन लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. लालबागच्या राजाची अखेरची झलक अनेकांनी त्यांच्या फोनमध्ये टिपली. तर, अनेकांनी गिरगाव चौपाटीवर प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि एबीपी माझाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी लालबागच्या राजाचं विसर्जन पाहिलं.  

लालबागचा राजा आज सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. त्यापूर्वीच अरबी समुद्राला भरती आल्यानं विसर्जनात अडथळा निर्माण झाला होता. भरती आणि ओहोटीची परिस्थिती निर्माण झाल्यानं विसर्जनाला साडे बारा ते तेरा तासांचा वेळ लागला. समुद्राला ओहोटी आल्यानंतर लालबागच्या राजाचा गणपती नव्या अत्याधुनिक तराफ्यावर साडे चार वाजता ठेवण्यात यश आलं होतं. लालबागच्या राजाच्या गणपतीच्या विसर्जनापूर्वीच्या उत्तर आरतीला उद्योजक अनंत अंबानी उपस्थित होते. 
 
अरबी समुद्रात विसर्जनासाठी लालबागच्या राजाच्या गणपतीची मूर्ती घेऊन तराफा साडे आठच्या दरम्यान निघाला . या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. दरवर्षी लालबागच्या राजाचं सकाळी साडे आठच्या दरम्यान विसर्जन होतं. मात्र, अरबी समुद्राला भरती आल्यानं गणपतीची मूर्ती नव्या तराफ्यावर ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या. ओहोटी सुरु झाल्यानंतर नव्या तराफ्यावर गणपतीची मूर्ती साडे चार वाजता ठेवण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा दागिने आणि आभूषणं लालबागच्या राजाला घालण्यात आली. विसर्जनापूर्वीची उत्तर आरती अनंत अंबानी यांच्या उपस्थितीत पार पाडली.  

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला काल सुरुवात झाली तेव्हा ज्या प्रकारे गर्दी होती त्याच पद्धतीनं गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. अनंत चतुर्दशी म्हणजेच काल सकाळी 12 वाजता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली होती.  आज सकाळी साडे आठ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. अखेर 12 तासानंतर रात्री साडे आठच्या सुमारास भरती पुन्हा सुरु झाल्यानं लालबागच्या राजाच्या विसर्जनाची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली. बारा तासांचा वेळ झाला तरी लालबागच्या राजाच्या भक्तांचा गिरगाव चौपाटीवरील उत्साह मात्र कायम आहे.

गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राज्याच्या अखेरचा निरोप देण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महापालिका, कोस्टगार्ड आणि मुंबई पोलीस दलानं तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता. या ठिकाणी गणेश भक्त देखील गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी कोळी बांधव देखील उपस्थित आहेत. कोळी बांधवांकडून गेल्या 24 वर्षांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यामध्ये मदत केली जाते.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget