एक्स्प्लोर

Lalbaugcha Raja : कोळी बांधवांना डावलले, विसर्जन चंद्रग्रहणात केले, लालबागचा राजा मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करा; मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mumbai Lalbaugcha Raja Visarjan : लालबागचा राजा मूर्तीचे विसर्जन 36 तासानंतर, चंद्रग्रहणाच्या काळात केल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे.

मुंबई : नवसाला पावणारा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गणेशोत्सव मंडळा (Ganeshotsav Mandal) विरोधात आता कोळी बांधवांकडून (Koli Community) गंभीर आरोप करण्यात येत आहेत. ज्या कोळी समुदायाने (Koli Samaj) लालबागच्या राजाची स्थापना केली, त्यालाच आता डावलण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप होत आहे. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने (Akhil Maharashtra Machhimar Kruti Samiti) थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार करत, मंडळाच्या कार्यकारिणीवर फौजदारी गुन्हे (Criminal Cases) दाखल करण्याची मागणी (Demand) केली आहे.

चंद्रग्रहणात विसर्जन, हिंदूंच्या भावना दुखावल्या

यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल 36 तास रखडल्यानंतर रविवारी रात्री 9.10 वाजता पार पडले. समुद्रातील भरतीमुळे गणेशमूर्ती तराफ्यावर न नेता आल्यानं विलंब झाला. अखेर ओहोटी सुरू झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मात्र या प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे गणपतीचे विसर्जन चंद्रग्रहणाच्या काळात झाले. यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून, कोळी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उत्सवाचे बाजारीकरण, भाविकांची अहवेलना

मच्छिमार समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विसर्जन प्रक्रियेतील गोंधळामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.

तसेच राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. मंडळातील सदस्यांनी उत्सवाचे बाजारीकरण केले असून, भाविकांची अवहेलना होत आहे असाही आरोप त्यांनी केला.

लालबागचा राजाचे दर्शन घ्यायला आलेल्या एका लहान मुलीशी गैरवर्तन झाल्याचा व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामुळे भक्तांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे असं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

कोळी बांधवांना डावलण्यात आलं

वर्षानुवर्षे विसर्जन सोहळा कोळी बांधवच पार पाडत आले आहेत. यंदा पहिल्यांदाच त्यांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. विसर्जन चंद्रग्रहणात करणे हा फक्त बाप्पांचा नव्हे तर कोळी समाज आणि हिंदू भाविकांचा अपमान आहे असा आरोप मच्छिमार कृती समितीने केला आहे.

मच्छिमार कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्या

  • दर्शन प्रक्रियेत तातडीने बदल करून VIP संस्कृतीवर मर्यादा आणाव्यात.
  • VIP दर्शनासाठी फक्त एकच दिवस राखीव ठेवावा.
  • भाविकांची चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पंडाल मोकळा ठेवावा.
  • विसर्जनाचा मान कोळी समाजाला कायम ठेवावा आणि एक दिवस आगरी-कोळी बांधवांसाठी राखीव करावा.

या सर्व मागण्यांसह मच्छिमार समितीने लालबागच्या मंडळाच्या कार्यकारी सदस्यांवर फौजदारी कारवाई व्हावी, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती

Embed widget