डोंबिवली: लग्नासाठी नकार दिल्यानंतरही तरुणानं सतत तगादा लावल्यानं, कंटाळून मुलीच्या आईनं आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. याप्रकरणी गिरीश बच्छाव या एकतर्फी प्रेमवीराला अटक करण्यात आली आहे.

 

गीता साळुंखे ही 35 वर्षीय महिला त्यांच्या 17 वर्षीय मुलीसह डोंबिवलीतल्या मानपाड्यात राहत होती. गिरीश बच्छाव हा रिक्षाचालक तिच्याकडे जेवायला येत होता. गिरीशला गीता यांच्या मुलीसोबत लग्न करायचं होतं. मात्र, याला गीता यांचा विरोध होता. त्यानंतरही गिरीशनं लग्नासाठी तगादा लावत मानसिक त्रास देणं सुरुच ठेवलं. अखेर गीता यांनी अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतलं. यामध्ये गीता यांचा मृत्यू झाला.

 

या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी एकतर्फी प्रेमवीर गिरीश याला अटक केली असून. गिरीशला बच्छावला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.