सिद्धेशच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करत एचआर असलेल्या कीर्ती व्यासने त्याला नोटीस दिली होती. कामात सुधारणा झाली नाही, तर त्याला कामावरुन काढून टाकण्याचा इशारा दिला होता. याच गोष्टीचा राग मनात धरत 16 मार्च रोजी सिद्धेश आणि खुशी या दोघांनी कीर्तीचं अपहरण केलं. गाडीतच तिची हत्या केली आणि त्यानंतर वडाळ्यातल्या नाल्यामध्ये तिचा मृतदेह फेकून दिला, असा दोघांवर आरोप आहे.
जेव्हा या दोघांच्या क्रूरकृत्याचं बिंग फुटलं... तेव्हा दोघांचाही खरा चेहरा समोर आला...
मुंबईतील कीर्ती व्यासच्या हत्येचं गूढ उकललं, सहकाऱ्यांकडून हत्या
सिद्धेश ताम्हणकरचं मुंबईतील भोईवाड्यात घर आहे. त्याला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. सिद्धेशचं शिक्षण बीकॉमपर्यंत झालं असून तो अंधेरीतल्या बीब्लंट सलूनमध्ये अकाऊंटन्ट म्हणून नोकरी करत होता. त्याचा महिन्याचा पगार हा 25 हजारांच्या आसपास होता
या घृणास्पद कृत्यातलं दुसरं नाव होतं ते म्हणजे खुशी सहज्वानी. 42 वर्षांची खुशी विवाहित आहे. तिला दहावीत शिकणारा एक मुलगा आहे. खुशीच्या पतीचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस असून सांताक्रूजमधल्या उच्चभ्रू इमारतीत ती राहते. बीब्लंट सलूनमध्ये ती प्रशिक्षण विभागात काम करत होती. तिला जवळपास 60 हजारांच्या घरात पगार होता
दीड महिन्यापासून बेपत्ता मुंबईकर तरुणीची हत्या?
खुशी आणि सिद्धेश यांच्यात प्रेमसंबंध होते. पण कीर्तीने बजावलेल्या नोटिशीमुळे सिद्धांतची नोकरी जाण्याची वेळ आली होती. आता कुठे प्रेमाची गाडी रुळावर येत असताना नोकरी जाण्याची चिंता आणि विरहाच्या भीतीने या दोघांनी एक भयंकर प्लॅन आखला आणि त्यात कीर्तीचा बळी गेला.
कीर्ती ग्रँट रोडमधील भारत नगर परिसरात राहत होती. ती 16 मार्चला सकाळी घराबाहेर पडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कीर्ती 8 वाजून 50 मिनिटांनी बिल्डिंगबाहेर पडताना दिसते. त्यानंतर सिद्धेश आणि खुशी यांनी तिला लिफ्ट दिली होती. कीर्तीला ग्रँट रोड स्टेशनजवळ असलेल्या नवजीवन सोसायटीजवळ सोडल्याचा दावा दोघांनी सुरुवातीला केला होता.
कीर्तीच्या आईने सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिला फोन केला होता, मात्र संपर्क होऊ शकला नव्हता. रात्रीपर्यंत कीर्ती घरी न आल्यामुळे तिच्या पालकांनी डी बी मार्ग पोलिसात तक्रार दाखल केली होती.
नवजीवन सोसायटीजवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कीर्ती गाडीतून उतरलेली दिसत नव्हती. तेव्हापासून कीर्तीचा ठावठिकाणा लागत नव्हता. तिचा फोनही स्वीच्ड ऑफ होता. शिवाय गेल्या सहा वर्षांत कधीच कुठला सहकारी कीर्तीला पिक अप करण्यासाठी न आल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता.
कीर्ती काम करत असेललं बीब्लंट सॅलॉन अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरची घटस्फोटित पत्नी अधुनाच्या मालकीचं आहे. कीर्ती बेपत्ता झाल्यानंतर फरहाननेही कीर्तीला शोधण्यासाठी ट्विटरवरुन आवाहन केलं होतं.
खरं तर कोणत्याही कॉर्पोरेट बिझनेसमध्ये कर्मचाऱ्यांकडून त्यांचे टार्गेट्स पूर्ण करण्याची अपेक्षा असते. पण प्रेमामध्ये मश्गुल असलेल्या या जोडप्याने कामाकडे तर दुर्लक्ष केलंच, पण एका साध्या आणि गुणी पोरीचं आयुष्य संपवलं. त्यामुळे आता इतक्या थंड डोक्यानं केलेल्या या हत्येप्रकरणी या दोघांना काय शिक्षा होणार हा सवाल आहे? पण त्यापेक्षा मोठा सवाल हा, की कुठे आहे कीर्ती व्यासचा मृतदेह?