बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2016 03:05 AM (IST)
वसईः बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सिताराम गुप्ता आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात, तुळींज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार जगदीश दुबे यांचा जमिनीच्या पैशांवरून सिताराम गुप्ता यांच्याशी वाद सुरू आहे. सिताराम गुप्ता यांचा मुलगा अनिल आणि अरविंद या दोघांनी अपहरण करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप जगदीश दुबे यांनी केला आहे. तसंच गुप्ता पिता-पुत्रांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही दुबे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सिताराम गुप्ता आणि त्यांच्या दोन मुलांना अटक केली होती. मात्र न्यायलयानं त्यांची जामीनावर सुटका केली आहे.