इमारतीमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाच्या सतर्कतेमुळे हा नराधम त्या मुलीला तेथेच टाकून पळून गेला. ही धक्कादायक घटना भिवंडी शहरातील जैतुनपुरा परिसरातील एका इमारतीच्या जिन्यावर घडली आहे. याप्रकरणी चिमुरडीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरण आणि विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित चिमुरडी दुपारच्या सुमारास इमारतीखाली असलेल्या दुकानात पाव खरेदी करण्यासाठी गेली होती. ती घरी परतत असताना आरोपी अकील याने तिच्या पाठीमागून येऊन तिचे तोंड दाबले. त्यानंतर आरोपी तिचे अपहरण करीत इमारतीतून घेऊन जात होता. यावेळी इमारतीमध्ये राहणार्या एका महिलेला येताना पाहून त्याने पीडित मुलीला टाकून घटनास्थळावरून पळ काढला.
व्हिडीओ पाहा
पीडित चिमुरडी घरी रडत आल्याने घरच्यांनी तिची चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. यावर पोलिसांनी नराधमाविरोधात कलम 363, 366 (आ), 506, 511 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर काही तासामध्ये पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली.