कल्याण : ठाणे-पुणे मार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक अखेर सुरु झाली आहे. दरड कोसळ्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. अखेर चार दिवसांनी दरड हटवण्याचं काम सुरु पूर्ण झालं आहे. 20 ऑगस्ट रोजी माळशेज घाटातल्या बोगद्याजवळ रात्री अडीचच्या सुमारास दरडकोसळली होती. दरड कोसळल्याने आयशर टेम्पो पूर्णपणे ढिगाऱ्याखाली अडकला. यामध्ये टेम्पोचालक अमोल दहिफळे गंभीर जखमी झाला. तर संपूर्ण रस्त्यावर दगड आणि माती पडली आहे. पाऊस आणि धुक्यामुळे दरड हटवण्यात व्यत्यय येत होता. त्यामुळे चार दिवस हे काम सुरु होतं. अखेर काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरु झाली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना माळशेज घाटात थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच 31 ऑगस्टपर्यंत माळशेज घाटातल्या सर्व धबधब्यांच्या एक किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहे.