Kalyan Thakurli : ठाकुर्ली ते कल्याण (Kalyan) रेल्वे स्थानकादरम्यान धक्कादायक घटना समोर आली आहे. रूळ ओलांडताना लोकलची ठोकर लागली आहे. यामध्ये रेल्वे स्थानकावरच मृत्यू झाला आहे. डोंबिवली (Dombivli) जीआरपी टीम घटनास्थळी दाखल झाली असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही दिवसातील कल्याण ते ठाणे मार्गावरील ही पाचवी घटना आहे. तर ठाकुर्ली रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान तीन दिवसातील दुसरी घटना आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे खळबळ उडाली आहे.
तीन दिवसांत दुसरी घटना
कल्याण रेल्वे स्थानकावर अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे वाढत्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कल्याण रेल्वे स्थानक देशातील गर्दी होणाऱ्या स्थानकांपैकी तिसरे स्थानक आहे. रेल्वे प्रशासनाकडून लिफ्ट आणि पादचारी पूलांची व्यवस्था करण्यात आलेले आहे. मात्र, तरिही मात्र, काही वेळेस प्रवाशांकडून बेशिस्तपणा पाहायला मिळतो. त्यामुळेही अपघातांची संख्या वाढत आहे.
कल्याण रेल्वे स्थानक बनलंय मृत्यूचा सापळा
गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या अपघातांमुळे कल्याण रेल्वे स्थानक मृत्यूचा सापळा बनलय का? असा सवाल विचारला जातोय. कारण तीन महिन्यात वेगवेगळ्या प्रकारे अपघात होऊन प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे.
काही दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारी
कल्याण रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारी झाली होती. त्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. प्रवाशांमध्ये शुल्लक कारणामुळे वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीमध्ये झाले. त्यानंतर या हाणामारीत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या