Kalyan Dombivli RTO Office : रात्री अपरात्री अथवा दिवसाही रिक्षा (Auto) चालक अनेकदा प्रवाशांकडून जास्तीचे भाडे वसूल करतात. नाईलाज असल्याने प्रवाशीही गुपचुप जातात. रात्री सार्वजनिक वाहने बंद असल्यामुळे ऑटो किंवा टॅक्सी ड्रायव्हर प्रवाशांकडून जास्तीचे पैसे उकळतात. तसेच प्रवाशांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यानं ऑटो ड्रायव्हर सांगतील तेवढे पैसे द्यावे लागतात. यामध्ये त्यांची अनेकदा आर्थिक फसवणूक होते. हा प्रकार आपण अनेकदा पाहिला असेल. कल्याण डोंबिवली आरटीओनं जास्तीचे भाडे उकळणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे सांगितलं आहे. प्रवाशांच्या तक्रारीकरीता कल्याण डोंबिवली आरटीओने व्हॉटसअप नंबरही अंमलात आणलाय.
कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात काही रिक्षा चालकांकडून प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी कल्याण आरटीओला (Kalyan Dombivli RTO Office) प्राप्त झाल्या होत्या .प्रवाशांची लूबाडणूक करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली जात नाही अशी प्रवासी वर्गाकडून ओरड केली जाते. या पार्श्वभूमीवर जास्तीचे प्रवासी भाडे उकळणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली आहे.
या वेळी गेल्या वर्षभरापूर्वीच मीटरचे प्रवासी भाडे जाहीर करण्यात आले आहे. मात्र शेअर प्रवासी भाडे जाहिर केलेले नव्हते. हे शेअर प्रवासी भाडे आज जाहीर करण्यात आले . मीटर प्रमाणो चालणाऱ्या रिक्षा चालकांनी मीटर प्रमाने भाडे द्यावे. तसेच ठरलेल्या शेअर भाडय़ा प्रमाने रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून प्रवासी भाडे घ्यावे. जास्तीचे प्रवासी भाडे घेतल्यास संबंधित रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई केली जाईल असा इशारा आरटीओ अधिकारी चव्हाण यांनी दिला आहे. प्रवासी रिक्षा भाडय़ा संदर्भात प्रवाशांना काही तक्रारी असल्यास त्यांनी 9423448824 या व्हॉटस्अप नंबर संपर्क साधावा असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live