जेसन जॉर्ज असं या तरुणाचं नाव असून, तो मुंबईचा रहिवाशी आहे. जेसनचं शरीर म्हणजे चालता-फिरता जाहिरात फलक आहे. जेसनच्या शरिरावरील टॅटू हे वेगवेगळ्या ब्रॅण्डचे सिम्बॉल आहेत.
यामध्ये म्हाडापासून अॅलन सोलीपर्यंत, रिझर्व्ह बँकेपासून ते रॉयल एन्फिल्डपर्यंत आणि गुगलपासून ते पुमापर्यंत विविधी ब्रॅण्डचे लोगो टॅटूने रेखाटले आहेत. जेसनच्या शरिरावर जवळपास 380 लोगो आहेत.
इतकंच नाही तर जेसनने त्याच्या गर्लफ्रेण्डचा चेहराही छातीवर टॅटूने गोंदला आहे.
"ब्रॅण्ड हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत,
म्हणूनच मी अंगभर टॅटूने रेखाटले आहेत.
ब्रण्डचा टॅटू रेखाटणं म्हणजे त्या-त्या ब्रॅण्डला धन्यवाद, थँक्स म्हणणं आहे",
असं जेसन सांगतो.
जेसनला आता विक्रमाचे वेध लागले आहेत. सर्वाधिक ब्रॅण्डचे टॅटू गोंदण्याचा विक्रम करण्याचा त्याचा मानस आहे.
"सध्या कोणाच्याही नावावर ब्रॅण्डच्या लोगोचा टॅटू शरिरावर काढण्याचा विक्रम नाही.
मी पहिला आणि एकमेव व्यक्ती आहे आणि मला याचा अभिमान आहे",
असं जेसन म्हणतो.
जेसनने 380 पैकी 321 लोगोंचीच विक्रमासाठी नोंद केली आहे. 300 ही मोठी संख्या आणि 21 हा लकी नंबर असल्याची भावना जेसनची आहे.
जेसनने 2015 मध्ये एकाच महिन्यात 177 टॅटू गोंदण्याचा विक्रम रचला होता.