Jain Muni Pigeon Feeding Protest: मुंबईतील खासकरून दादरचा कबुतरखाना (Dadar Kabutarkhana) पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनी निलेशचंद्र विजय (Nileshchandra Vijay) आझाद मैदानात (Azad Maidan) आमरण उपोषणाला बसले आहेत. जोवर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अन्न आणि पाण्याचा त्याग करत असल्याचं त्यांनी जाहीर केल असून संध्याकाळी त्यांना आझाद मैदानातून उठवण्याचा प्रयत्न झाल्यास थेट दादरच्या कबुतरखान्यात आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांना दिवसरात्र आंदोलन करायला दिलं जाऊ शकत तर जैन मुनीला का नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
जैन मुनींनी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या? (Jain Muni Pigeon Feeding Protest)
नवीन कबुतरखाने सुरू करण्याऐवजी जुनेच कबुतरखाने सुरू करावेत. दादरचा कबुतर खाना सुरु झाला पाहिजे. दादरचा कबुतरखाना सुरू करावा कारण आमच्या देवाच्या समोरच तो आहे. कबूतरांना खाद्य टाकण्याची परवानगी दिली पाहिजे, असे जैन मुनी निलेशचंद्र यांनी दिला आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
दोन किलोमीटरच्या अंतरावर जागा द्या (Jain Muni Pigeon Protest)
पालिकेने दिलेल्या पर्यायी जागा मुनींना अमान्य आहेत. बीएमसीकडून दिलेल्या पर्यायी जागा चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहेत. यावर जैन मुनींनी कबुतरांना इतक्या दूर जाता येणार नाही, असा दावा केला आहे. दोन किलोमीटरच्या अंतरावर जागा द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. दादर कबुतरखाना शांतीनाथ परमात्माजवळ आहे आणि तो 100 वर्ष जूना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कबूतरांना हक्काचं घर मिळवून देणं आमचा हक्क असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कबूतरांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला असून अजूनही मृत्यू होत आहे. आम्ही त्यांचे संरक्षण करत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या