Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: आम्ही कधीही मराठीचा अपमान केलेला नाही, मराठी माणसाचा अपमान केलेला नाही, ते आमच्या संस्कारात नाही, असं जैन मुनि निलेश चंद्र यांनी म्हटलं आहे. आज (28 नोव्हेंबर) एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या विशेष माझा कट्ट्यामध्ये बोलताना मूनी यांनी मराठी विरुद्ध मारवाडी वादावर सविस्तर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सुद्धा खोचक शब्दांमध्ये टीका केली. 

Continues below advertisement


तुम्ही चापट मारणार असाल तर..


राज ठाकरे यांच्या संदर्भात बोलताना जैन मुनि निलेशचंद्र म्हणाले की, ते (राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत) म्हणाले की, तुम्ही मारवाड्याला मारा म्हणता, पण फोटो काढू नका म्हणता. मात्र, आम्ही मराठी बोलायचं, म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे अशी विचारणा जैन मुनि यांनी केली. ते म्हणाले की, आम्ही कधीही मराठीचा अपमान केलेला नाही. ते आमच्या संस्कारात नाही. जर तुम्ही मराठी बोल म्हणा असाल तर आम्ही मराठी बोलतो. मात्र, तुम्ही चापट मारणार असाल तर आम्ही बोलणार नसल्याचे जैन मुनि म्हणाले. अशा पद्धतीने बोलणारे तुम्ही कोण आहात? अशी विचारणा जैन मुनि निलेशचंद्र यांनी केली. यावेळी बोलताना जैन मुनि यांनी मुंबईमधील मारवाडी विरुद्ध मराठी झालेल्या वादाची उदाहरणे दिली. भाईंदरमध्ये काय झालं? अशीही विचारणा त्यांनी केली. 


मला हा वाद संपवायचा आहे 


मला हा वाद संपवायचा आहे असेही मुनि म्हणाले. राज ठाकरे यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की राज ठाकरे मराठी हिंदू हृदयसम्राट आहेत. त्यामुळे तुम्हीच हा वाद निपटू शकता, दुसरं कोणीच हा वाद संपवू शकत नाही. राजसाहेब आले की सर्व मराठी एकत्र होतील आणि सर्व प्रकरण संपून जाईल असेही जैन मुनि यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, राज ठाकरे म्हणतात तुम्ही मारवाड्याला मारा, पण फोटो काढू नका म्हणता. मात्र, आता मी मारवाड्यांचे संघटन करणार असल्याचे जैन मुनि म्हणाले. जवळपास मारवाड्यांच्या 36 कोम असून त्यांचे संघटन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठीचा वाद हा फक्त मुंबईमध्येच असून बाकी राज्यात कुठेही वाद नसल्याचा दावा जैन मुनि यांनी केला. ते म्हणाले की यांचं बघून आता आंध्रमध्ये हा वाद सुरू झाला आहे. 


प्रत्येकाला धर्म रक्षण करण्याचा अधिकार 


मला कबूतर, मंदिर, गोमाता सुरक्षित हवे असल्याचे एका प्रश्नाचे उत्तर देताना जैन मुनि यांनी सांगितले. दरम्यान, अशीच भाषा काही मुस्लिम शासकाकडून सुद्धा केली जात होती, फतवे काढले जात होते, या संदर्भात आपलं मत काय? अशी विचारणा केली असता जैन मुनि म्हणाले की, प्रत्येकाला धर्म रक्षण करण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केलं. 



इतर महत्वाच्या बातम्या