मुंबई: महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर कबूतर खाण्याचा (Kabutar Controversy) विषय पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान, अशा आशयाचे पोस्टर्स सध्या सोशल मिडीयावरती (Social Media) व्हायरल झाले आहेत. शांतीदूताच्या कबुतरांना आता त्याच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरवात प्रत्येक मराठी लोकांना करावीच लागेल असं त्या बॅनरवरती लिहलं आहे. या अगोदर देखील आम्ही गिरगांवकर संघटनेने कबुतर खाण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. काल( शनिवारी, ता ११) जैन समाजाच्या सभेनंतर आता आम्ही गिरगांवकर संघटना आक्रमक झाली आहे. 

Continues below advertisement

Kabutar Controversy :  बॅनरवरती नेमकं काय लिहलंय?

आम्ही गिरगांवकर कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान, शांतिदूतांच्या कबुतरांना आता त्यांच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना आता करावीच लागेल

Jain Community Dharm Sabha:  जैन समुदायाच्या सभा

दादरमध्ये जैन समुदायाकडून मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी काल (शनिवारी, ता ११) प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दादरच्या (Dadar) योगी सभागृहात ही प्रार्थनासभा (Pigeon Prayer Meeting) पार पडली. मुंबईतील कबूतरखाने पुन्हा सुरू व्हावेत, अशी मागणी देखील या प्रार्थनासभेतून करण्यात आली आहे. कबुतरांच्या मृत्यूमुळे जैन समुदायात (Jain Community) चिंता व्यक्त होत आहे. कबूतरखाने बंद झाल्याने अनेक कबुतरे रस्त्यावर येत असून, अपघातांमध्ये त्यांचा मृत्यू होत असल्याचा दावा समुदायाकडून केला जात आहे. या प्रार्थनासभेच्या माध्यमातून कबुतरांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जाईल. मुंबईतील कबूतरखान्यांच्या मुद्द्यावर सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या (Kabutar Controversy) पार्श्वभूमीवर या प्रार्थनासभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Continues below advertisement

Kabutar Controversy : मुंबईत कबुतरांचा वाद पुन्हा पेटणार?

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा सपाटा लावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, जैन समाजाने (Jain Community) या कारवाईला कडाडून विरोध केला होता. याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. मुंबईच्या दादर परिसरात जैन समाजाने रस्ता रोखून धरत मुंबई महानगरपालिकेने कबुतरखान्यावर (Dadar Kabutar Khana) लावलेली ताडपत्री चाकू आणि सुऱ्यांनी फाडून काढली होती. मात्र, यानंतरही मुंबई महानगरपालिका (BMC) आपल्या भूमिकेवर ठाम राहिली होती. परंतु, जैन समाजाच्या काही मुनींना विनाकारण आक्रमक भाषा वापरत राज्य सरकार आणि न्यायव्यवस्थेला ललकारले होते. मात्र, प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने दादरचा कबुतरखाना बंदही झाला होता आणि या सगळ्यावरुन रंगलेले राजकारणही आपोआप थंडावले होते. मात्र, आता जैन समाजाच्या एका नव्या कृतीमुळे हा कबुतरखान्यांचा हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. 

Kabutar Controversy : कबुतरखाने उभारले जातील तेथे तेथे चिकन-मटण सेंटर उभारण्याची भूमिका 

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जेव्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबुतरखान्याचे उद्‍घाटन करताना मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबुतरखाने उभारले जातील, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने जेथे जेथे कबुतरखाने उभारले जातील तेथे तेथे चिकन-मटण सेंटर उभारण्याची भूमिका घेतली होती. ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेने लोढा यांच्या घोषणेला तीव्र विरोध केला होता. ‘लोढा यांनी कबुतरखान्यांचा खेळ सुरू केला आहे. हा डाव आम्ही हाणून पाडू,’ असा इशारा त्यांनी दिला होता. लोढा यांच्या राहत्या इमारतीत आणि जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर उभारण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे पत्रही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते.