एक्स्प्लोर

International Level Fish Market In Mumbai: अंधेरी-मरोळमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या घाऊक मासळी बाजार प्रकल्पास मान्यता; महाराष्ट्रात ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ मजबूत पाऊल

International Level Fish Market In Mumbai: मुंबईतील मरोळ येथे 138 कोटी रुपयांच्या आधुनिक घाऊक मासळी बाजार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

International Level Fish Market In Mumbai मुंबई: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या सन 2025-26 च्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये मुंबईतील मरोळ (अंधेरी) येथे 138 कोटी रुपयांच्या आधुनिक घाऊक मासळी बाजार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच मासेमारी बंद कालावधीत पारंपरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सुमारे 2816 लाभार्थ्यांना उपजीविका व पोषण सहाय्य देण्याचाही समावेश आहे. 

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्याचा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा व निधी वितरणात विलंब होऊ नये, यासाठी त्यांनी संबंधित केंद्रीय मंत्रालय, राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ (NFDB) आणि इतर प्राधिकरणांशी नियमित संवाद साधला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा महत्त्वाचा प्रकल्प प्रशासकीय मान्यतेपर्यंत पोहोचला असल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे.

हजारो मासेमार व संबंधित घटकांना रोजगार आणि स्थैर्य मिळेल- नितेश राणे

मुंबईसारख्या महानगरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार उभारणे ही काळाची गरज होती. या प्रकल्पामुळे केवळ व्यापार सुलभ होणार नाही, तर हजारो मासेमार व संबंधित घटकांना रोजगार आणि स्थैर्य मिळेल. महाराष्ट्रात ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ मजबूत करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असं नितेश राणे म्हणाले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये-

मरोळ येथे उभारण्यात येणारा हा आधुनिक मासळी बाजार बहुमजली (सहा मजली) इमारतीसह अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज असणार आहे . यामध्ये थंड साखळी व्यवस्था (Cold Chain), स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन, अग्निसुरक्षा प्रणाली, सौरऊर्जा प्रकल्प, आधुनिक विद्युत व्यवस्था, प्रशस्त पार्किंग तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार व्यवस्थापन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच या बाजारामुळे मासळी साठवण, वर्गीकरण, प्रक्रिया व वितरण यामध्ये गुणवत्ता सुधारणा होऊन निर्यात क्षमतेत वाढ होईल. तसेच पारंपरिक मासेमार, घाऊक विक्रेते व व्यापाऱ्यांना सुसंगत आणि पारदर्शक व्यापाराचे आधुनिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

राज्याच्या मत्स्यव्यवसायाला नवे बळ- (International Level Fish Market In Mumbai)

या प्रकल्पामुळे मुंबई व परिसरातील विद्यमान बाजारपेठेवरील ताण कमी होऊन नियोजित, स्वच्छ व तांत्रिकदृष्ट्या सक्षम बाजारव्यवस्था निर्माण होणार आहे. निर्यातदारांना दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्याने महाराष्ट्राची समुद्री उत्पादन निर्यात वाढण्यास मदत होईल. राज्य शासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र देखरेख व मॉनिटरिंग यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला असून, सर्व प्रक्रिया केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात येणार आहेत. मंजूर करण्यात आलेले हे उपक्रम महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रात संरचनात्मक व दीर्घकालीन बदल घडवून आणणारे ठरणार असून, राज्याच्या समुद्री अर्थव्यवस्थेला नवे बळ देणारे आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Mumbai Crime: कांदिवलीत खळबळजनक घटना, पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, बायकोने गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
कांदिवलीत खळबळजनक घटना, पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, बायकोने गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
Embed widget