एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिंथेटिक हिऱ्यांची मागणी वाढली, खरा हिरा कसा ओळखायचा?
मुंबईतल्या सराफा बाजारात पारंपरिक खऱ्या हिऱ्यांपेक्षा सिंथेटिक हिऱ्यांची विक्री जास्त होऊ लागली आहे.
मुंबई: दागदागिने घेणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. तुम्ही जर हिरे खरेदी करणार असाल तर थोडी सावधानता बाळगा. कदाचित तुमची फसवणूक होऊ शकते. कारण मुंबईतल्या सराफा बाजारात पारंपरिक खऱ्या हिऱ्यांपेक्षा सिंथेटिक हिऱ्यांची विक्री जास्त होऊ लागली आहे.
सिंथेटिक हिऱ्यांची किंमत खऱ्या हिऱ्यांच्या किंमतीपेक्षा 70 टक्क्यांनी स्वस्त आहे. त्यामुळे साहजिकच या हिऱ्यांची विक्री वाढली आहे.
मुंबईसह देशातील हिरे बाजारात सिंथेटिक हिऱ्यांच्या‘एन्ट्री’मुळे पारंपरिक हिरे व्यापारी अस्वस्थ झाले आहेत. दागिन्यांसाठीच नव्हे, तर गुंतवणूक म्हणून हिऱ्याची खरेदी करण्याच्या ट्रेंडवर याचा परिणाम होईल, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.
खरंतर कलर, कॅरेट, क्लॅरेटी आणि कट या चार ‘सी’च्या आधारेही खऱ्या हिऱ्यांची अद्यापही ग्राहक पारख करु शकत नाहीत. अशातच सिंथेटिक हिरे बाजारपेठेत आल्यानं फसवणुकीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येतोय. त्यामुळे हिरे खरेदी करताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
खरा हिरा
खरा आणि सिंथेटिक हिऱ्यातील फरक!
खरा हिरा निसर्ग निर्मित असतो
निसर्ग निर्मित असल्याने रासायनिक प्रक्रियेचा संबंध नाही
खऱ्या हिऱ्यांवर देशातील अनेक शहरांत पैलू पाडण्याचं काम
कारागिरींच्या मदतीने खऱ्या हिऱ्यांना पैलू पाडले जातात
खऱ्या हिऱ्यांची किंमत लाखांपासून कोटींच्या घरात आहे
--------------------
सिंथेटिक हिरा
सिंथेटिक हिरे हे मानव निर्मित असतात
रसायनांचा वापर करुन सिंथेटिक हिऱ्यांची निर्मिती करण्यात येत
सिंथेटिक हिऱ्यांना पैलू पाडण्यासह सर्व प्रक्रिया परदेशात होतात.
सिंथेटिक हिऱ्यांवर पैलू पाडण्यासाठी मशिनरीचा वापर होतो
खऱ्या हिऱ्यांच्या तुलनेत सिंथेटिक हिरे 70 टक्के स्वस्त
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement