मुंबई : आयआयटी मुंबईच्या संघाने सोलर शेगडी चॅलेंजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. सोलर शेगडी चॅलेंज स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ओएनजीसीतर्फे ही स्पर्धा ठेवण्याचे सुचवले होते. इलेक्ट्रिक शेगडीचा कार्यक्षम वापर कसा करता येईल, याबाबत प्रतिकृती तयार करायची होती.



एकूण 1500 प्रवेशिका या स्पर्धेसाठी आल्या होत्या. यामध्ये दोन फेऱ्यांनंतर 20 संघांना आपापल्या प्रतिकृती परिक्षकांसमोर दिल्लीत दाखवण्याची संधी मिळाली. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सहा संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.



या सहा संघांना सोलर शेगडीवर स्वयंपाक प्रात्यक्षिक करायला सांगण्यात आले. हे प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर 23 एप्रिल 2018 ला ही स्पर्धा पार पडली. त्यानंतर परीक्षकांनी या 6 संघांचं परीक्षण करुन सोलर शेगडीमधील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता याबाबत परीक्षण करुन विजेते घोषित करण्यात आले. यामध्ये पाहिलं पारितोषिक आयआयटी मुंबईच्या संघाला 24 एप्रिल 2018 रोजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते देण्यात आले.