मुंबई : प्लास्टिक बंदीच्या विरोधात पर्यावरण खात्याने कडक पावलं उचलली आहेत. प्लास्टिक पिशवी सापडेल ते दुकान कायमचं बंद केलं जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.


आज प्लास्टिक बंदी संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.


प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी दुकानदारांकडून आता प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. या प्रतिज्ञापत्रात प्लॅस्टिक वापरणार नाही असं नमूद करून घेतलं जाणार आहे. सर्वांना पुरेशी संधी देण्यात आली आहे, त्यामुळे आता कारवाईला समोरं जावं लागेल असाच पवित्रा पर्यावरण मंत्र्यांनी घेतला आहे.


महाराष्ट्रात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. पहिल्या वेळेस कुणाकडे प्लास्टिक सापडल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जातो आहे. दुसऱ्या वेळेस 10 हजार आणि तिसऱ्या वेळेस 25 हजार रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा आहे.


कोणत्या प्लास्टिकवर बंदी?


सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (यात मायक्रॉन, साईजच्या मर्यादा नाहीत), चहाचे कप, सरबतचे ग्लास, थर्माकोल ग्लास, डेकोरेसन थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक (डब्बे, चमच, पिशवी), फरसाण, नमकीन यांसाठची पदार्थांची आवरणं (यात उत्पादक कंपन्या पॅकिंगसाठी वापरणाऱ्या प्लास्टिकचा यात समावेश नाही).


संंबंधित बातम्या


प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी विशेष कृतीदलाची स्थापना


प्लास्टिक बंदी योग्यच, सरकारकडून हायकोर्टात निर्णयाचं समर्थन


प्लास्टिकबंदीचं धोरण दुटप्पी, वीरेन शाहांकडून प्रश्न उपस्थित