एक्स्प्लोर

12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई

परीक्षा केंद्रातील शाळांना सीसीटीव्ही लावणे इतर सुविधा, पाणी, बसेस वेळेवर पोहचल्या पाहिजे यांसह सर्वच निर्देश दिले होते.

नाशिक : राज्यात 12 वी बोर्ड परीक्षेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून राज्य सरकारच्या कॉपीमुक्त (Copy) अभियानास पहिल्याच दिवशी हरताळ फासण्यात आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्रावरील अधिकारी आणि पर्यंवेक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले असून पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे निर्देश दिले असताना आता, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनीही संबंधित केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल, तसेच पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. 

परीक्षा केंद्रातील शाळांना सीसीटीव्ही लावणे इतर सुविधा, पाणी, बसेस वेळेवर पोहचल्या पाहिजे यांसह सर्वच निर्देश दिले होते. तरीही 12 वी परीक्षांत कॉपीच्या घटना घडल्याचं दिसलं. त्यामुळे, कॉपीच्या घटना समोर आलेल्या केंद्रावर रद्द बातलची कारवाई केली जाईल, यापुढे परवानगी दिली जाणार नाही. कॉपी करणाऱ्यांसह केंद्र प्रमुख आणि पालकांवरही कारवाई केली जाईल. ज्या शाळांनी पालन केले नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. 

कॉपीमुक्त परीक्षा अभियान

राज्यात बारावीच्या परीक्षा प्रगती पथावर आहेत, सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं की,  निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जा. गुरुजींनी ज्ञान दानाचे काम केलं आहे. मुख्यमंत्री यांनी मुलांना सूचना दिल्या होत्या, त्यानुसार कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जात आहे. त्यामध्ये शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. महसूल विभाग, गृह, ग्रामविकास विभागाचे सहकार्य घेतले जाते, आढावा बैठक घेतली जाते. मात्र, जिथं कॉपीचे प्रकार घडले तिथे कारवाई करण्यात येईल, असे दादा भुसेंनी स्पष्ट केले.  

मराठवाड्यात कॉप्यांचा सुळसुळाट

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कॉपी प्रकरणे पुढे आली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर (ता. कन्नड) येथे इयत्ता 12 वीच्या इंग्रजी पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघडकीस आला. परीक्षा केंद्रावरील CCTV फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे तब्बल 19 पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांवर कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. येथील दक्षता समितीचे अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने संपूर्ण तपास पूर्ण केला.

19 जणांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित 

या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण 19 जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक आणि तिथल्या पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा

अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget