Mumbai Rain news: मुंबई आणि उपनगर परिसरात मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या सेवेवर परिणाम झाला आहे. हार्बर रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरील (Central Railway) वाहतूक पाच ते सात मिनिटं उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) लोकल ट्रेनची सेवा अद्याप सुरळीत आहे. याशिवाय, मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरातही मुसळधार पाऊस सुरु आहे.  मुंब्रा, महापे, ऐरोली परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (Mumbai Heavy Rain news)

Continues below advertisement

मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटे चार वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या या सरींचा जोर प्रचंड होता. सकाळी सातच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला असला तरी आकाशात अजूनही काळ्या ढगांची गर्दी असून पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून जोरदार पाऊस झाला आहे. ठाण्यात रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. ठाण्यात गेल्या 22 तासात 11.69  मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

Water Logging Rain: मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीचा खोळंबा

Continues below advertisement

जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सायन-बेलापूर महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी झाला आहे. एलबीएस मार्गावर भांडूप ते विक्रोळी दरम्यान वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तर जेव्हीएलआर आणि एससीएलआरवर वाहतूक सुरळीत सुरु आहे.

IMD Alert: पावसाचा जोर 13 ऑगस्टपासून पुन्हा वाढण्याची शक्यता

हवामान विभागाने हवामानासंबंधित एक महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर केला आहे. येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. तसेच चालू महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून 13 ऑगस्टपासून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा

मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?