Gunaratna Sadavarte Viral Video: ओबीसी कोट्यातून सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा (31 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानात हजारो मराठा आंदोलकांसह जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मराठा आरक्षण विरोधात सातत्याने आक्रमक वक्तव्य करून मराठा आंदोलकांच्या संतापात भर घालणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधातही मराठा आंदोलकांमध्ये चांगला संताप पसरला आहे. सदावर्ते यांनी गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. परळी येथील राहत्या फ्लॅटमधून सदावर्ते यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल सुरू असल्याने मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
साहेब लै खालच्या लेव्हलवर जाऊन बोलू नका
दरम्यान, सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ सपशेल घाबरलंय म्हणून व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओमध्ये जयश्री पाटील पत्रकार परिषदेपुर्वी सदावर्ते यांना सांभाळून बोलण्याचा सल्ला देत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की पत्रकार परिषदेसाठी सदावर्ते तयारी करत असताना जयश्री पाटील बाजूने म्हणतात, की साहेब लै खालच्या लेव्हलवर जाऊन बोलू नका, त्यांचा मोर्चा आपल्याकडे वळायचा. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. सदावर्ते यांनी सातत्याने मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत आक्रमक वक्तव्य केली आहेत.
सदावर्तेचं घर कुठं आहे?
दरम्यान, काल मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईमध्ये पोहोचले आहेत. दक्षिण मुंबईमध्ये अवघं मराठा वादळ अवतरलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये जमलेल्या मराठा आंदोलकांमध्ये सदावर्ते यांच्याबाबत राग असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही आंदोलकांकडून भाऊ सदावर्तेचं घर कुठं आहे? अशी विचारणा करण्यात येत होती. त्यामुळे मराठा आंदोलकांचा सदावर्ते यांच्यावर असलेला राग स्पष्टपणे दिसून येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या