Gunaratna Sadavarte on Raj Thackeray : आपल्या मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरेंना (Raj Thackeray) किती मिरची लागली. संदीप देशपांडे साहेबांना अटक झाल्यावर कार्यक्रम घेऊन ते बोलले नाहीत. शेजारी आणि आपले कोण हे त्यांना कळतं असे म्हणत अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी राज ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे ज्ञान पाजळावं. शिवसेना भवनच्या आतमधील फोटो प्रोटोकॉल प्रमाणे आहे का? असा सवाल सदावर्तेंनी केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो एकत्र आहे. राज ठाकरे तुम्ही किती मिनिटात किती तासात हे फोटो काढता? असा सवाल सदावर्तेंनी केला. राज ठाकरे यांची अवस्था लोका सांगे ब्रम्हज्ञान अशी झाल्याचे सदावर्ते म्हणाले.
सांगा त्या उद्धवला बाळासाहेबांचा तो फोटो काढायला
शिवसेना भवनवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. त्यांचा फोटो मोठा आहे, ते वर ठेवले जाऊ शकतात का? असा सवाल यावेळी सदावर्तेंनी केला. सांगा त्या उद्धवला बाळासाहेबांचा तो फोटो काढायला. हा अपमान सहन केला जाणार नाही. तमाम छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतात त्यांना विनंती करतो, मी यांना 15 दिवसांची मुभा देतो. 15 दिवसांत जर हा फोटो काढला नाही तर मी स्वतः न्यायालयामार्फत स्ट्रगल करु, वेळप्रसंगी मी उपोषण करेल असा इशारा सदावर्तेंनी दिला.
DJ बंद करुन दाखवा, राज ठाकरेंना आव्हान
भीम जयंती हीच दिवाळी, DJ वाजणार असेही सदावर्ते म्हणाले. कायद्याची पायमल्ली कोणी करत नाही. राज ठाकरेंना आव्हान आहे की DJ बंद करुन दाखवा असे सदावर्ते म्हणाले. राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का? असा सवाल सदावर्तेंनी केला. DJ वाजवण्यावर बंदी नाही आली पाहिजे, DJ संदर्भात कोणाला त्रास देत असेल तर मला कॉल करा असेही सदावर्ते म्हणाले.
संविधानाने सनवार साजरे करायचे नियम दिले आहेत
दरम्यान, काही सामाजिकदृष्ट्या कायदेशीर बदल अपेक्षित आहेत असेही सदावर्ते यावेली म्हणाले. भारतीय संविधानाने सनवार साजरे करायचे नियम दिले आहेत असे सदावर्ते म्हणाले. दहीहंडी या उत्सवात हानी होते, काल बालकाचा मृत्यू झाला, त्या कुटुंबाला सरकारच्या वतीने भेट द्यावी, जेवढे जास्त शक्य होईल तेवढा त्या कुटुंबाचा विचार करावा असेही सदावर्ते म्हणाले. जे गोविंदा जखमी झालेत त्यांना उपचार मिळावेत असेही सदावर्ते म्हणाले.
