Gunaratna Sadavarte on Raj Thackeray :  काही दिवसांवरच गणेशोत्सव आला आहे. राज्यात मोठ्या उत्साहात गणशोत्सव साजरा केला जात असतो. दरम्यान, या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात डीजे (DJ), डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या वापरावरून वातावरण चांगलच तापलं आहे. ध्वनीप्रदूषण, नागरिकांचे आरोग्य आणि सणांची सांस्कृतिक परंपरा या मुद्द्यांवरून नागरीक, गणेश मंडळे आणि राजकीय नेत्यांमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. अशातच याच मुद्यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखील भूमिका घेतली आहे. कसले डॉल्बी वगैरे लावत आहात? कसले डीजे? आपल्या पारंपरिक पद्धतीने सण का साजरे होत नाहीत? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. आता यावरुन अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केलीय

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

भीम जयंती हीच दिवाळी आहे. DJ वाजणार असेही सदावर्ते म्हणाले. कायद्याची पायमल्ली कोणी करत नाही. राज ठाकरेंना आव्हान आहे की DJ बंद करुन दाखवा असे सदावर्ते म्हणाले. राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का? असा सवाल सदावर्तेंनी केला.  DJ वाजवण्यावर बंदी नाही आली पाहिजे, DJ संदर्भात कोणाला त्रास देत असेल तर मला कॉल करा असेही सदावर्ते म्हणाले.  दरम्यान, काही सामाजिकदृष्ट्या कायदेशीर बदल अपेक्षित आहेत असेही सदावर्ते यावेली म्हणाले. भारतीय संविधानाने सनवार साजरे करायचे नियम दिले आहेत असे सदावर्ते म्हणाले.

डीजे मुद्यावर काय म्हणाले होते राज ठाकरे?

दरम्यान, डीतेच्या मुद्यवर राज ठाकरेंनी देखील भूमिका मांडली आहे. डीजे बंदीवरून सध्या वाद चालू आहे. याबाबत मी कधीच भूमिका घेतली होती. कसले डॉल्बी वगैरे लावत आहात? कसले डीजे? आपल्या पारंपरिक पद्धतीने सण का साजरे होत नाहीयत?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. इतक्या श्रद्धेने गणपती घरी आणायचा आणि विसर्जन करताना नाचता? कसला आनंद होतोय? यात कसला आनंद साजरा करताय? असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला. माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती येतो. मुलांसाठी मी आणला. ज्यावेळी गणपती जातो तेव्हा ओकंबोकं वाटतं घर. उत्साह गेल्यासारखा वाटतं. वाईट वाटतं त्यावेळेला. मग वाईट वाटण्याऐवजी कसला उत्साह साजरा करताय असेही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. जीडे बंद करुन दाखवाच असं आव्हान सदावर्ते यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. त्यामुळं आता सदावर्तेंच्या भूमिकेवर मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement