एक्स्प्लोर

Pydhonie Deaths: डोकाडिया कुटुंबातील व्यक्तींच्या यकृत अन् मूत्रपिंडाचा हिरवट रंग; 'हिस्टोपॅथॉलॉजी' अहवालात धक्कादायक खुलासा; अवयवांचा हिरवट रंग विषबाधेचे संकेत, रिपोर्ट समोर

Pydhonie Deaths: मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून येण हा झिंक फॉस्फाइड विषबाधेचा महत्त्वाचा संकेत असल्याच अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

मुंबई : मुंबईतील पायधूनीतील परिसरातील डोकाडिया (Pydhonie Deaths) कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूचा हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल समोर आला आहे.  कुटुंबियांच्या शरीरात झिंक फॉस्फाइड आढळल्याच्या फॉरेन्सिक अहवालाला हिस्टोपॅथॉलॉजी अहवालातून दुजोरा दिला आहे. मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून आल्याचं हिस्टोपॅथॉलॉजी अहवालात स्पष्ट झालं आहे. मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून येण हा झिंक फॉस्फाइड विषबाधेचा महत्त्वाचा संकेत असल्याच अहवालात नमूद करण्यात आलं आहे.(Pydhonie Deaths)

उंदराचे विष सेवन केल्यानंतर मृत्य झालेल्या प्रकरणांमध्ये अशी लक्षणे दिसून येतात. २६ एप्रिलला पायधूनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा अवघ्या काही तासांच्या अंतरात मृत्यू झाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांना त्रास सुरू झाला. चौघांच्याही शरीरात तसेच कलिंगडाच्या नमुन्यांवर झिंक फॉस्फाइडचे अंश सापडल्याने हत्या किंवा आत्महत्येच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे. (Pydhonie Deaths)

पायधुनी येथील डोकडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यू प्रकरणातील सर जे. जे. रुग्णालयाचा 'हिस्टोपॅथॉलॉजी' अहवाल आता पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात नेमका कोणत्या प्रकारचा एफआयआर (FIR) नोंदवावा, याबाबत तपास अधिकारी अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.

एफडीए (FDA) आणि एफएसएलने (FSL) घेतले अन्न, पाणी आणि टरबूजाचे नमुने

२६ एप्रिल रोजी डोकडिया कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला होता, ज्यानंतर सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या अधिकाऱ्यांनी घरातील खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या अर्ध्या टरबूजाचे नमुने तपासणीसाठी गोळा केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएच्या अहवालात खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. मात्र, एफएसएलच्या अहवालात टरबूजाच्या नमुन्यात 'झिंक फॉस्फाईड' (Zinc Phosphide) आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. झिंक फॉस्फाईडचा वापर प्रामुख्याने उंदीर मारण्याचे औषध म्हणून केला जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता जे. जे. रुग्णालयाकडून हिस्टोपॅथॉलॉजी अहवालही प्राप्त झाला असून, या प्रकरणातील आता कोणताही अहवाल प्रलंबित नाही.

Mumbai Pydhonie Family: डोकाडिया कुटुंब संपण्यामागील नेमकं कारण काय? 

पायधूनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणी डोकाडीया कुटुंबीयांच्या शरीरातून तसेच जप्त करण्यात आलेल्या कलिंगडाच्या नमुन्यात झिंग फॉस्फाईड सापडल्याने मृत्यूचं कारण जरी हे विषारी रसायन असलं तरी त्याला डॉक्टरांच्या पुष्टीची आवश्यकता आहे. पोलीस एफसीएलचा अहवाल सर जेजे रुग्णालयाच्या तज्ञांना सोपवतील जे मृत्यूची अचूक कारणे आणि याप्रकरणी अद्याप अनुत्तरित असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देतील. जेजे रुग्णालयाचे न्यायवैद्यक शस्त्र विभागाचे तज्ञ तसेच इतर विभागातील तज्ञ डॉक्टरांचं पथक आता या अहवालाचा सखोल अभ्यास करणार आहे. यावेळी चौघांना झालेली विषबाधा, तीचं स्वरूप, विषबाधा झाल्यानंतर समोर आलेली लक्षणे त्यांची खालावलेली परिस्थिती तिचा वेग या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या मृत्यूचं स्वरूप, मृत्यूचा प्रकार, मृत्यू होण्याची वैद्यकीय प्रक्रिया या चौघांना कोणते गंभीर आजार असल्यास या सगळ्यांची जोडणी करून जेजे रुग्णालयाच्या तज्ञ पथक तपास करणार आहे.

Mumbai Pydhonie Family: नेमकं प्रकरण काय?

डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर 26 एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा पक्ष खिळखिळा केला, 6 खासदार फोडले, आता महाराष्ट्रात कोणत्या पक्षाकडे किती खासदार?
उद्धव ठाकरेंचा पक्ष खिळखिळा केला, 6 खासदार फोडले, आता महाराष्ट्रात कोणत्या पक्षाकडे किती खासदार?
Omraje Nimbalkar: ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंना आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
Omraje Nimbalkar: पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
Ravi Rana on Opearation Tiger UBT: सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले,
सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, "आणखी दोघे माझ्या संपर्कात"
Shivsena case in Supreme Court: गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
OmRaje Nimbalkar: 'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
Omraje Nimbalkar: ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
Embed widget