भिवंडी : सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्राफेम संतोष चौधरी उर्फ 'दादूस' याला वीज चोरीप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नारपोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दादूससोबत आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही 21 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रकरण काय आहे?
भिवंडीत टोरंट पॉवर कंपनी व राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने भिवंडीतील कामतघर परिसरातील एका निवासी भागात छापा टाकून बिल्डरसह सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा फेम दादूसच्या विरोधात कारवाई केली.
भिवंडी शहरातील कामतघर येथे बिल्डर सचिन प्रभुलाल ठक्कर याने निवासी इमारतीच्या समोरील विद्युत वाहिनीला थेट केबल जोडणी करुन तो वीजपुरवठा ऑर्केस्ट्रा फेम संतोष उर्फ दादूस चौधरी यांच्या घरात जोडणी केली. या वीजचोरीची तपासणी टोरंटच्या भरारी पथकाने केली होती. त्यानंतर बिल्डर सचिन ठक्कर व संतोष चौधरी यांना 3 लाख 66 हजार रुपये विद्युत अदा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र वीज बिलाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करू लागल्याने नारपोली पोलिसांनी या दोघांना अटक करुन, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात स्मोवारी हजर केले. या दोघांनी न्यायालयातही वीज बिल जमा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे न्यायालयाने या दोघा वीज चोरांची रवानगी थेट ठाणे मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या कडक निर्णयामुळे चोरट्या वीज चोरांचे धाबे दणाणले असून, भिवंडीतील वीजचोरीविरोधात टोरंट पॉवर कंपनी प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतल्याने वीज चोरांमध्ये धडकी भरली आहे.
अंगावर किलोभर सोनं, ‘दादूस’ला वीज चोरीप्रकरणी बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2018 07:22 PM (IST)
भिवंडीत टोरंट पॉवर कंपनी व राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने भिवंडीतील कामतघर परिसरातील एका निवासी भागात छापा टाकून बिल्डरसह सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा फेम दादूसच्या विरोधात कारवाई केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -