- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- मुंबई Ganpati Visarjan 2025 LIVE: पुढच्या वर्षी लवकर या! तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन
Ganpati Visarjan 2025 LIVE: पुढच्या वर्षी लवकर या! तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन
Ganpati visarjan 2025: मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे विसर्जन काल पार पडले. आता 33 तासांनंतर लालबागच्या राजाचंही विसर्जन पार पडलं.
Lalbaugcha Raja Visarjan 2025: तब्बल 33 तासानंतर अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. यंदा वेळेचं नियोजन चुकल्यानं खोळंबा झाल्याचं दिसून आलं. या विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भक्तांनी लालबागच्या राजाला प्रणाम केला.
लालबागचा राजा जागचा हलेना, गणेश गल्लीचे कार्यकर्ते मदतीला जाताच पाट हलला, विसर्जन कधी होणार? सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
Lalbaugcha Raja Visarjan 2025: विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, वाडकर बंधू वर्षानुवर्षे हे काम करत होते; कोळी बांधवांचा लालबागचा राजा मंडळावर आरोप. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आणखी दोन तास लागणार. समुद्राची भरती ओसरल्यानंतर लालबागचा राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात येईल. तीन वाजेनंतर पाण्याची पातळी आणखी खाली येणार.
लालबागचा राजाची मूर्ती पाण्यातून हलवण्यात अखेर यश आले आहे. गेल्या पाच तासांपासून लालबागचा राजा समुद्रात बसून होता. लालबागच्या राजाचा पाट जड झाला होता. अखेर गणेश गल्लीचे कार्यकर्ते लालबागच्या राजाच्या मदतीला आले. त्यानंतर लालबागचा राजाची मूर्ती हलवण्यात यश आले आहे.
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाचा पाट जड झाला, पाच तासांपासून बाप्पा पाण्यात बसून, किनाऱ्यावरील भक्तांच्या चेहऱ्यावर काळजीची छाया. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
लालबागच्या राजाला तराफ्यावर विराजमान करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. गेल्या तीन तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती अर्धवट बुडालेल्या अवस्थेत समुद्रात होती.
मागील काही तासांपासून लालबागच्या राजाची मूर्ती अर्धी पाण्यात
समुद्राची भती कमी झाल्यावरच मूर्तीचे विसर्जन होणार
पाणी कमी झाल्यावर तराफ्यावर मूर्ती चढवली जाणार
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : मुंबईतील लोकप्रिय गणेश मंडळांपैकी एक असणाऱ्या लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीची घरी जाण्याची वाट यंदा समुद्राने अडवली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, रविवारी सकाळी साधारण पावणेआठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या लालबागचा राजाचे विसर्जन अद्यापही होऊ शकलेले नाही. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
अनंत चतुर्दशीचा दिवस संपल्यानंतरही मुंबईतील गिरगाव चौपाटीवर अद्याप गणपती विसर्जन सुरु आहे. लालबागचा राजा मंडळासह अनेक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे विसर्जन अद्याप बाकी आहे. गेल्या तासाभरापासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गणपती विसर्जनात अडथळे येण्याची शक्यता आहे.
लालबागचा राजाच्या विसर्जनात विघ्न, गणपती समुद्राजवळ नेला पण.... नेमकं काय घडलं? सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
लालबागचा राजाचे विसर्जन होण्यास यंदा वेळ लागणार आहे. समुद्राला भरती आल्यामुळे गणपतीची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अडचण. सर्व बोटी दूर झाल्या, समुद्राची भरती ओसरून ओहोटी सुरु झाल्यानंतर विसर्जन होणार.
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर येऊन तब्बल दोन तास उलटले आहेत, तरीही या मूर्तीचे विसर्जन होऊ शकलेले नाही. समुद्राला भरती आल्यामुळे लालबागचा राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आलेली नाही. आता समुद्राची भरती ओसरल्यानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन केले जाईल, अशी माहिती समोर येत आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणीचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन. तराफा बोटींनी ओढून समुद्रात नेला
लालबाग राजाची ट्राॅली पाण्यात अडकल्याने तराफ्यावर मूर्ती चढवण्यास अडचण होतं आहे
अद्याप तराफ्यावर लालबागचा राजा चढला नाही आहे
भरती आहे अशात तराफा हालतोय
थोड्याच वेळात तराफ्यावर चढवतील
आत्ता दागिने काढण्याचे काम सुरु आहे
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला असून त्याची मूर्ती थोड्यावेळात स्वयंचलित तराफ्यावर चढवण्यात येईल. लालबागचा राजाच्या आरतीसाठी भक्तांची गर्दी
चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनसाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. थोड्याचवेळात विसर्जन होईल. हा गणपती काल सकाळी मंडपातून निघाला होता.
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर समुद्रापर्यंत पोहोचला आहे. आता थोड्याचवेळात लालबागचा राजाच्या आरतीला सुरुवात होईल.
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी. PHOTO पाहण्यासाठी क्लिक करा
Lalbaugcha Raja Visarjan 2025: रात्रीचा अंधार, मुसळधार पाऊस, तरीही लालबागचा राजाच्या दर्शनाला तुफान गर्दी, भायखळ्यात फायरब्रिगेडकडून बाप्पाला सायरन सॅल्युट. PHOTO पाहण्यासाठी क्लिक करा
लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची प्रचंड गर्दी. आता थोड्याचवेळात लालबागचा राजाची आरती केली जाईल. त्यानंतर लालबागचा राजाला स्वयंचलित तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेले जाईल.
लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. गिरगाव चौपाटीवर सध्या भक्तांची अलोट गर्दी आहे
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या जवळ पोहोचला. लालबागचा राजाच्या रथावर अनंत अंबानी हेदेखील उपस्थित आहेत. लालबागचा राजाला पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी.
लालबागचा राजा ऑपेरा हाऊसवरुन गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाची आरती होईल. त्यानंतर लालबागचा राजाचे विसर्जन केले जाईल. लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी.
गणेश विसर्जनाच्या उत्साहात साकीनाका परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. खैराणी रोड परिसरात श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना ट्रॉलीला हाय टेन्शन वायरमधून शॉक बसला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
मुंबईतील विविध गणरायांच्या विसर्जन मिरवणुकांतला उत्साह शिगेला. परळचा राजा, गणेश गल्लीच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन संपन्न. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगावच्या चौपाटीजवळ,दहा किलोमीटरच्या अंतरासाठी सुरु आहे १८ तासांपासून मिरवणूक. यंदा मूर्ती विसर्जनासाठी वापरणार अत्याधुनिक तराफा
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीजवळ दाखल. लालबागचा राजा ऑपेरा हाऊसच्या परिसरात दाखल झाला असून थोड्याचवेळात गिरगाव चौपाटीवर पोहोचेल.
लालबागचा राजासाठी यंदा नव्या अत्याधुनिक स्वयंचलित तराफ्यावरून होणार विसर्जन
मागील तराफ्याच्या तुलनेत हा तराफा हा दुप्पट मोठा असून आधुनिक आहे
हा तराफा पाण्यात ३६०डिग्रीमध्ये कुठेही वळण घेऊ शकतो
मागील वर्षीच्या तराफ्याला कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने सुमद्रात ओढून न्यावं लागत होतं
हा अत्याधुनिक तराफा स्वयंचलित आहे
विरार : गणेश विसर्जनाच्या दिवशी विरार–सफाळे सुवर्णदुर्ग रो-रो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचा जीव वाचला. यात एका महिलेचाही समावेश आहे.
आज शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास विरारच्या मारंबळपाडा जेट्टीवर एका कुटुंबाने आपला घरगुती गणपती विसर्जनासाठी समुद्राकडे प्रयाण केले. कुटुंबात सुमारे सहा ते सात जण होते. पालिकेकडून विसर्जन व्यवस्थेसाठी कर्मचारी हजर नसल्याने त्यांनी स्वतःच समुद्रात उतरून विसर्जन करण्याचे धाडस केले. स्थानिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन पुरुष आणि एक महिला थेट समुद्रात उतरले.
समुद्राची खोली व पाण्याचा वेग लक्षात न आल्याने तिघेही समुद्राच्या खोल पाण्यात वाहत गेले. ते बुडत असल्याचे लक्षात येताच तेथील सुवर्णदुर्ग रो-रो सेवेचे कर्मचारी तात्काळ फेरीबोट घेऊन त्यांच्या दिशेने धावले. त्याचवेळी एका स्थानिक मच्छिमार बांधवानेही आपली बोट घटनास्थळी नेली. यामुळे दोघा पुरुषांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. तर थोड्या अंतरावर वाहत गेलेल्या महिलेचा जीव स्थानिक मच्छिमाराने आपल्या छोट्या बोटीच्या मदतीने वाचवला.
समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे हे तिघे एक ते दीड किलोमीटर आतपर्यंत वाहून गेले होते. परंतु रो-रो कर्मचाऱ्यांची तत्परता आणि स्थानिक मच्छिमार बांधवांच्या मदतीमुळे ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठी दुर्घटना टळली.
मुंबई उपनगरात पवई तलावाच्या परिसरात अद्याप अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी आहे. या गणेशमूर्ती पवई तलावाच्या परिसरात रांगेत उभ्या आहेत.
लालबागचा राजा विसर्जनासाठी थोड्याचवेळात गिरगाव चौपाटीवर दाखल होणार. लालबागचा राजा काल सकाळी 10 वाजता विसर्जनासाठी मंडपातून निघाला होता.
लालबागच्या राजाची मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू असून तो सध्या भायखळाच्या हिंदुस्थानी मशिदीसमोर पोहोचला आहे. या ठिकाणी पोहोचण्यास लालबागचा राजाला 11 तास लागले आहेत. यावेळी राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
लालबागच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक सुरू असून श्रॉफ बिल्डिंगसमोर लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत सध्या गणेश विसर्जनाचा सोहळा शिगेला पोहोचला असून संपूर्ण गिरगाव चौपाटीवर भक्तीचा जनसागर लोटला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त चौपाटीवर दाखल होत असून अतिशय भक्तिमय वातावरणात विसर्जनाचा हा महासोहळा इथे पार पडतोय.
Bhiwandi: अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भिवंडी शहरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या निमित्ताने परोपकार संस्थेच्या वतीने मुंबई, भाईंदर,ठाणे आणि भिवंडी परिसरात पाच ते साडेपाच लाख वडापावचे मोफत वितरण करण्यात येत आहे. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात तब्बल एक ते दीड लाख वडापाव भक्तांना वाटप करण्यात येणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परोपकार संस्थेच्या वतीने गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत वडापाव वाटपाची परंपरा पुढे नेण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही संस्था गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणेश भक्तांना वडापाव वाटपाची सेवा देत आहे. यावर्षी देखील या सेवेसाठी तब्बल एक महिन्यापासून तयारी करण्यात आली आहे.
या सेवेसाठी 100 ते 150 कामगार 24 तासांपासून वडापाव तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होताच, या वडापावचे वितरण परोपकार संस्थेच्या स्वयंसेवकांकडून करण्यात येत असतो, अशी माहिती आयोजकांनी दिली. गणेश विसर्जनाचा दिवस असल्याने भिवंडीमध्ये भक्तगण मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर उतरले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक दुकानं बंद असतात आणि त्यामुळे भक्तांची गैरसोय होऊ नये त्यामुळे एका वेळेची नाश्त्याची व्यवस्था त्यांची व्हावी यासाठी या संस्थेच्या वतीने वडापाव चे वितरण करण्यात येत असतो. विविध मंडळांच्या मिरवणुका शहरातील प्रमुख चौकांतून पार पडत असून भाविक उत्साहात या उपक्रमात सहभागी होत असतात.
गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. छोट्या मूर्तींसह आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मोठे गणपतीही विसर्जनासाठी दाखल होऊ लागले आहेत. मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असली तरी भक्तांच्या उत्साहात कुठेही कमी दिसत नाही. ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोषी वातावरणात आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात चौपाटीवर भक्तांनी हजेरी लावली आहे. आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या आढाव्यात उत्साह, भक्ती आणि भावनांचा संगम स्पष्ट दिसून आला.
मुंबईच्या परळ परिसरातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाची ‘परळचा महाराज’ मूर्ती यंदाही उत्साही वातावरणात येत आहे. यंदाची मूर्ती या शहरात विशेष लोकप्रिय ठरली होती कारण तिच्या आकार, सजावटी आणि कलात्मकतेमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत होती. यावेळीही मंडळाने पर्यावरणपूरक आणि पारंपरिक शैलीत मूर्ती तयार केली असून, तिचा समुद्रात थेट विसर्जन न करता विधीपूर्वक अभिषेक करून परत मंडळात नेण्याचा निर्णय घेतला आहे. भक्तगण आणि स्थानिक नागरिक मूर्ती पाहण्यासाठी उत्सुक आहेत. परळचा महाराज यंदाही श्रद्धा आणि उत्साहाचे प्रतीक ठरणार आहे, असे मंडळाचे सदस्य सांगतात.
गणपती विसर्जनाला पोलीस यंत्रणा आणि महापालिकेचे कर्मचारी यांच्यावरती मोठा तणाव असतो. अशावेळी अनेक दानशूर व्यक्तींनी हात पुढे करत पोलिसांच्या जेवणाची चहा नाष्ट्याची व्यवस्था केलीय. गिरगाव चौपाटी जवळील भाटिया इमारतीच्या सदस्यांनी एकत्रित येऊन सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी यांच्यासाठी दोन दिवसांच्या जेवण , चहा नाष्ट्याची व्यवस्था केलीय. गेली चोवीस वर्षांपासून ते या सर्व पोलीस यंत्रणा आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या प्रतीच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. याची दखल वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी ही घेतलीय.
ANC
(WKT)
गणेशोत्सवात श्रद्धा आणि पर्यावरणपूरकतेचा संगम घडवणारी पहिली सुतार गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती आज गिरगाव चौपाटीवर दाखल झाली आहे. संपूर्ण पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती समुद्रात थेट विसर्जन न करता, विधीपूर्वक अभिषेक करून पुन्हा एकदा मंडळात नेण्यात येणार आहे.
यावेळी मंडळाकडून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे—पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक मंडळाने पर्यावरणपूरक मूर्तींचाच स्वीकार करावा. श्रद्धा आणि निसर्ग या दोन्हींचं रक्षण हेच या विसर्जनाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी ईशान देशमुख जयंती
गिरगाव चौपाटीवर यंदाचा गणेशोत्सव जोरदार उत्साहात सुरू झाला आहे. शहरातील विविध मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे भव्य गणपती आज चौपाटीवर दाखल होऊ लागले आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असून नागरिक उत्साहाने उत्सव साजरा करत आहेत. मंडळांच्या भव्य सजावट, रंगीबेरंगी शोभा आणि संगीताने परिसर उत्सवमय वातावरणाने उजळून निघाला आहे.
गणेशोत्सवातील पारंपरिक सोहळ्यांसह आधुनिक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनीही उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आहे. यावेळी उपस्थितांना सोशल डिस्टन्सिंगचा आणि सुरक्षेचा योग्य खबरदारी उपाय केला जात आहे. गिरगाव चौपाटीवर गणपती दाखल होताच वातावरणात उत्साहाची लाट पसरली असून प्रत्येक मंडळ आपला गणपती खास सोहळ्यांसह सादर करत आहे.
R mum Girgoan chowpatty vis n wkt
परदेशी पाहुण्यांनी चर्नी रोड परिसरात विराजमान केलेला थायलॅंडचा राजा देखील आज निरोप घेत आहेत. मागील ३ वर्षांपासून थायलॅंडवरुन येत हे परदेशी पाहुणे भारतात येत सेवाभावे गणरायांची उपासना करत आहेत. मागील ४ दिवसांपासून त्यांनी राज्यातील गणेशोत्सव साजरा केला. पारंपारिक पद्धतीनं ह्या सर्व मंडळींनी पेहराव घातला होता. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी
Lalbaugcha Raja 2025: लालबागचा राजाच्या मुखदर्शनाच्या लाईनमधील शेवटचा भाग्यवंत भक्त कोण? VIDEO व्हायरल. सविस्तर वाचा
गिरगाव चौपाटीवरती घरगुती गणपती बाप्पांचं विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. गिरगाव चौपाटी वरती पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. एक हजाराहून अधिक पोलीस गिरगाव चौपाटीवरती तैनात करण्यात आलेत.
श्रीगणरायला निरोप देण्यासाठी विविध सोयी-सुविधांसह बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज
सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी
श्रीगणेश विसर्जनासाठी ७० नैसर्गिक स्थळं व सुमारे २९० कृत्रिम तलाव उपलब्ध.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली १०,००० अधिकारी-कर्मचारी,
२४५ नियंत्रण कक्ष कार्यरत.
निर्माल्य कलश, नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका इ. सुविधा सज्ज.
मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे – नागरिक व मंडळांना आवाहन.
सुरक्षा व सुविधा व्यवस्थापन
चौपाट्यांवर वाहने अडकू नयेत म्हणून १,१७५ स्टील प्लेट
छोट्या मूर्ती विसर्जनासाठी - ६६ जर्मन तराफे
२,१७८ जीवरक्षक, ५६ मोटरबोटी तैनात
५९४ निर्माल्य कलश आणि ३०७ निर्माल्य वाहने
नियंत्रण आणि समन्वय
विभागीय समन्वयासाठी - २४५ नियंत्रण कक्ष
सुरक्षा देखरेखीसाठी - १२९ निरीक्षण मनोरे
विसर्जन स्थळी - ४२ क्रेन, २८७ स्वागत कक्ष
आरोग्य व प्रकाश व्यवस्था
२३६ प्रथमोपचार केंद्र
व ११५ रुग्णवाहिका.
रात्रीच्या विसर्जनासाठी - ६,१८८ फ्लडलाईट्स व १३८ सर्चलाईट्स
१९७ तात्पुरती शौचालयं
आपत्कालीन तयारीसाठी - अग्निशमन दलाचे वाहन व कर्मचारी
कृत्रिम तलावांची माहिती
२९० कृत्रिम तलावांची यादी www.mcgm.gov.in संकेतस्थळावर. यामध्ये गुगल मॅप लिंकसह उपलब्ध.
QR कोड स्कॅन किंवा BMC WhatsApp Chatbot: ८९९९२२८९९९ वरून माहिती.
नागरिकांना सूचना व आवाहन
विसर्जनस्थळी पावित्र्य व शिस्त राखावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिसांच्या सूचना पाळाव्यात.
गर्दीत सतर्क राहावे, जबाबदारीने वागावे.
मत्स्यदंश व सागरी सुरक्षितता
ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे. यापासून सावध रहावे.
मत्स्यदंश झाल्यास वैद्यकीय कक्ष व १०८ रुग्णवाहिका उपलब्ध.
भरती-ओहोटी:
६ सप्टेंबर:
सकाळी ११.०९ – ४.२० मीटर भरती
सायंकाळी ५.१३ – १.४१ मीटर ओहोटी
रात्री ११.१७ – ३.८७ मीटर भरती
७ सप्टेंबर:
पहाटे ५.०६ – ०.६९ मीटर ओहोटी
सकाळी ११.४० – ४.४२ मीटर भरती
भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना
१. समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नका.
२. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत घ्या.
३. काळोखाच्या जागी व निषिद्ध क्षेत्रात विसर्जन टाळा.
४. बुडणारी व्यक्ती दिसल्यास तात्काळ सूचना द्या.
५. अफवा पसरवू नका, विश्वासही ठेवू नका.
६. लहान मुलांची विशेष काळजी घ्या.
चिंचपोकळीचा चिंतामणी थोड्याचवेळात विसर्जनासाठी मंडपातून निघणार आहे. चिंतामणीच्या आरतीला सुरुवात
लालबागचा राजाच्या मूर्तीची उत्तरपूजा सुरु. आता लालबागच्या राजाची आरती केली जाईल. त्यानंतर लालबागचा राजा मंडपातून विसर्जनासाठी निघेल.
लालबागच्या विसर्जनासाठी खास अत्याधुनिक तराफा
गिरगाव चौपाटीवर दरवर्षी उसळणारा भक्तिसागर आणि पूर्वीच्या दुप्पट आकारापेक्षा यावर्षी राजाच्या तराफ्याची रचना विशेष आहे....
त्यामुळे त्याला समुद्रात मार्गक्रमणासाठी कुठल्याही बोटीच्या साह्याची गरज भासणार नाही. कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा तराफा स्वतःच समुद लाटांवर स्वार होऊन आगेकूच करणार आहे..
विसर्जनावेळी भार सांभाळताना तो स्थिर राहावा, यासाठी विशेष अभियांत्रिकीचा वापर करण्यात आला आहे. गुजरातमध्ये हा विशेष तराफा तयार करण्यात आला आहे....
विशेष म्हणजे, ३६० अंशांत पाण्याचे फवारे उडवणारे स्प्रिंकलर देखील यामध्ये बसवण्यात आले आहेत.
लालबाग परिसरात मानाचे गणपती विसर्जनसाठी निघाले. परळचा राजा गिरगावच्या दिशेने मार्गस्थ, मुंबईचा राजाही गिरगावच्या दिशेने निघाला. लालबागचा राजा थोड्याचवेळात मंडपातून बाहेर पडणार
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, मुंबईसह ठाण्यात देखील मुसळधार पाऊस बरसत आहे. ठाण्यात मागील २४ तासात ४४ मिलिमीटर इतका पाऊस पडलाय तर आज दिवसभर देखील मुसळधार पावसाचा अंदाज सांगितला गेला आहे
गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती चौपाटीवर करण्यात आली आहे. सोबतच, मुंबई पोलिसांची देखील मोठी कुमक तैनात असणार आहे. परदेशी पाहुणे आणि व्हीव्हीआयपींना राज्य गणेशोत्सव बघता यावा यासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडून मंडपांची उभारणी केली गेली आहे. सोबतच, लहान घरगुती गणपती देखील यायला सुरुवात झाली आहे.
अधूनमधून पडत असलेल्या मुसळधार पावसात गणेश भक्तांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही.... या मुसळधार पावसात सुद्धा परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले आहेत... परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही मंडपातून आता पुढे गणेश गल्लीकडे मार्गस्थ होत आहेत. 24 फुटांचा परळीचा राजाची श्री राम रुपी मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ
मुंबईतील परळचा राजा मंडळाचा गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.
मुंबईचा राजा मंडपातून निघाला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळख. मुंबई राजा मंडपातून निघाल्यानंतर लालबाग परिसरातील गणपती विसर्जनासाठी निघणार
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला 10 वाजता सुरुवात होणार आहे. बाप्पाला निरोप देताना लालबागचा राजा मंडळांच्या कार्यकर्त्यांचे अश्रू अनावर झाले आहेत.
मुंबईतील पहिला गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ, परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु
गणेश गल्ली मुंबईचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला आठनंतर सुरुवात होईल. त्याआधी हारांनी सजवलेला रथ गणेश गल्लीमध्ये पाहायला मिळतोय. याच रथामध्ये मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक होणार आहे
लालबाग मार्केट व चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम) : लालबाग उड्डाणपुलाखाली भाविकांचा पहिला निरोप.
भायखळा स्टेशन (पश्चिम) : डेलिसल रोडपासून S-ब्रिज ओलांडत मूर्तीचा पुढील प्रवास.
हिंदुस्तान मशीद, भायखळा : सांप्रदायिक सौहार्दाचे प्रतीक मानला जाणारा हा थांबा. येथे मशिदीच्या समिती सदस्यांकडून दरवर्षी मूर्तीचे स्वागत केले जाते.
भायखळा अग्निशमन दल : अग्निशमन दलाच्या जवानांकडून लालबागच्या राजाला विशेष श्रद्धांजली वाहण्यात येते. मेगा अग्निशमन केंद्रातील सर्व वाहनांकडून गणेशमूर्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी सायरन वाजवून श्रद्धांजली वाहण्यात येते.
नागपाडा चौक (खडा पारसी/एस. मोहनी चौक) : रंगेबिरंगी विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या गर्दीचा मोठा टप्पा
गोल देऊळ/दो टाकी क्षेत्र : गजबजलेल्या बाल्कनी आणि गल्ल्यांसह ऐतिहासिक परिसर.
ऑपेरा हाऊस ब्रिज (सीपी टँक/प्रार्थना समाज/एसव्ही रोड) : येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत मिरवणूक शेवटच्या टप्प्याकडे जाते.
गिरगाव चौपाटी : 'पुढच्या वर्षा लवकर या' म्हणत दुसऱ्या दिवशी पहाटे अरबी समुद्रात बाप्पाला शेवटचा निरोप दिला जातो.
लालबागच्या राजाला हार घालण्यात आला आहे. पूजेची तयारी सुरू आहे
मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्याला पावसाची हजेरी लागणार आहे. कालपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज पहाटेपासूनही पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज आहे.
गणेश गल्लीचा गणपती हा मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो. हा गणपती मंडपातून निघाल्यानंतरच या परिसरातील बाकीचे गणपती विसर्जनसाठी निघतात.
मुंबईत गणेश विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 25 हजार पोलीस कर्मचारी तैनात. 10 हजार महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात.
Ganesh Visarjan 2025 : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे काही तास शिल्लक; 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन, वाचा योग्य पूजा पद्धत आणि विधी. सविस्तर वाचा
लालबागच्या राजाची दर्शन रांग आता बंद करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता लालबागचा राजा मंडपातून विसर्जनासाठी निघेल. लालबागाचा राजाची विसर्जन मिरवणूक उद्यापर्यंत चालणार आहे.
मुंबईतील पहिला मानाचा गणपती अशी ख्याती असलेल्या ‘विश्वविक्रमी' मुंबईच्या राजाची विसर्जन आरती ठीक. सकाळी ८.०० वाजता सुरू होईल... व त्यानंतर गिरगाव चौपाटीच्या दिशेने विसर्जन मिरवणुक मार्गस्थ होईल
पार्श्वभूमी
Ganpati visarjan 2025: अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे काल अनंत चतुदर्शीला मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि अन्य परिसरात विसर्जन (Ganesh immersion 2025) पार पडले. लालबागचा राजाचे थोड्याचवेळात गिरगाव चौपाटीवर आगमन होईल. यानंतर लालबागचा राजाला विशेष तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेले जाईल आणि त्याचे विसर्जन होईल. मुंबईतील अनेक ठिकाणी अद्याप सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी आहे. मुंबईतील पवई तलावाच्या परिसरात मोठ्या गणपतींची रिघ लागली आहे.