Ganesh Naik and Eknath Shinde: मंत्रिपद काय चाटायचंय का? गणेश नाईक एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर संतापले; नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून शिंदे-नाईक वाद पुन्हा पेटला
Ganesh Naik and Eknath Shinde: वाशी येथे घेण्यात आलेल्या जनता दरबारात गणेश नाईकांनी सिडको आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनाही लक्ष केले.

मुंबई : नवी मुंबईकरांच्या (Navi Mumbai) सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते, हॉस्पिटल, गार्डन यासाठी भूखंडाची आम्ही मागणी करतोय. ते सर्व नवी मुंबईकरांचे भुखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम सिडकोने केले आहे. मला या गोष्टीची मला लाज वाटते, ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे, त्या मंत्रिमंडळातल्या नगरविकास विकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्म दरिद्री काम केले आहे. माझा राग शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करा असा संताप व्यक्त करीत गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे नगरविकास खाते असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर परत एकदा टिका केली आहे. मी जर नवी मुंबईकरांसाठी चांगले काम नाही केले तर मंत्रीपद काय चाटायचे आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. वाशी येथे घेण्यात आलेल्या जनता दरबारात गणेश नाईकांनी सिडको आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनाही लक्ष केले.
नगर विकास खात्यातील लोकांनी हे कर्म दरिद्री काम केलं
नगर विकास खात्यावरती टीका करत भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावरती तोफ डागली आहे, नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत असा आरोप देखील गणेश नाईक यांनी केला आहे. नगर विकास खात्यातील लोकांनी हे कर्म दरिद्री काम केलं आहे, जर चांगलं काम केलं नाही तर मंत्रीपद काही चाटायचा आहे का असा सवाल ही गणेश नाईक यांनी केला आहे.
हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद शाळे करता, रुग्णालया करता भुखंड मागितले ते पण दिले गेले नाही, काही दलालांनी ते बिल्डरच्या घश्यात घातले, मला या गोष्टीची लाज वाटते, ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे, त्या मंत्रिमंडळातील नगर विकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्म दरिद्री काम केलं आहे, मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून एमआयडीसी कडून विकासाकरिता जनतेच्या हिताकरिता जे भूखंड आहे, ते देण्याची व्यवस्था करा, म्हणजे माझा राग अहिस्ते अहिस्ते कमी होईल, निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचे प्रशासनाच्या शिस्तीचा मी आहे, परंतु ज्या गोष्टीसाठी गणेश नाईक आमदार झाला, मंत्री झाला, ते जर जनते करता मी बोलू शकलो नाही, मी जर मिळवू शकलो नाही, तर ते मंत्रीपद काय चाटायचा आहे का? मंत्रीपद पक्षाने दिलं मी पक्षाचा आभारी आहे, परंतु याचा अर्थ ते मुका होऊन बसण्यासाठी ते मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही, असंही पुढे गणेश नाईक यांनी म्हटले आहे.
























