नवी मुंबई : तळोजाजवळील पर्ल वेअर हाऊस या धान्याच्या गोदामाला आज दुपारी भीषण आग लागली आहे . अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं नाही.
आज दुपारी लागलेल्या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालं आहे. तळोजाजवळील धरणे कॅम्प जवळ हे गोडाऊन आहे. दुपारी या गोडाऊनने अचानक पेट घेतला. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची धान्य ठेवण्यात आली होती. ती ही जळून खाक झाली आहेत. या गोडाऊनच्या बाजूलाही धान्याचा मोठा खच असल्याने त्याने पेट घेतला आणि ही आग अधिकच भीषण झाली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तळोजा एमआयडीसी, पनवेल, नवी मुंबई मनपाचे सहा बंब प्रयत्न करत आहेत. मात्र आग अद्याप सुरूच आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे .
नवी मुंबईत धान्याच्या गोडाऊनला मोठी आग, सर्व धान्य जळून खाक
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
26 Nov 2017 05:04 PM (IST)
तळोजाजवळील पर्ल वेअर हाऊस या धान्याच्या गोदामाला आज दुपारी भीषण आग लागली आहे . अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -