भिवंडी : भिवंडीतल्या पद्मानगरमध्ये नारायण कंपाऊंड येथील कापड कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत दोन्ही कारखाने जळून खाक झाले आहेत. रमेश शहा हे कारखान्याचे मालक आहेत.
अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कारखान्यात लाकडी पोटमाळ्यावर मोठ्या प्रमाणात कापड, तागे आणि धागा साठवलेला असल्याने सर्वत्र आग पसरली.
कारखान्याच्या चारही बाजूस दाट नागरी वस्ती असल्याने पोलिसांनी जवळपास 50 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे.
भिवंडीत कापड कारखान्याला आग, लाखो रुपयांचं नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Feb 2018 09:25 AM (IST)
भिवंडीतल्या पद्मानगरमध्ये नारायण कंपाऊंड येथील कापड कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत दोन्ही कारखाने जळून खाक झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -